मुंबई ते सावंतवाडी १८ विशेष गाड्या

मध्य रेल्वेला उशिरा जाग आल्याची चाकरमान्यांची प्रतिक्रिया
मुंबई ते सावंतवाडी १८ विशेष गाड्या
मुंबई ते सावंतवाडी १८ विशेष गाड्याsakal media

मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वेमधील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. होळीच्या सुट्ट्यांनिमित्त मध्य रेल्वे एलटीटी ते सावंतवाडी रोडदरम्यान १८ अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. एलटीटी ते थेट सावंतवाडी एक्स्प्रेस सोडणे आवश्यक होते. होळीच्या आधीपासून या गाड्या सोडल्या असत्या, तर प्रवाशांना अधिक सोयीस्कर झाले असते. त्यामुळे मध्य रेल्वेला हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया चाकरमान्यांनी दिली.

गाडी क्रमांक ०१०२३ विशेष गाडी २५ मार्च ते २ एप्रिलपर्यंत एलटीटी येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता सावंतवाडी रोडला पोहचेल. गाडी क्रमांक ०१०२४ विशेष गाडी २६ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत सावंतवाडी रोड येथून सकाळी ११.३५ वाजता सुटेल आणि एलटीटी येथे त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा असेल.

गाड्या कायमस्वरुपी करा!

रेल्वे प्रशासनाद्वारे कोकणात सोडण्यात आलेल्या १८ विशेष गाड्या फक्त सणासुदीला आणि होळीसाठी मर्यादित न ठेवता, कायमस्वरूपी केल्या जाव्यात. यासह या गाडीला २४ डबे जोडण्यात यावेत, अशी प्रतिक्रिया चाकरमान्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com