

Central Railway Traffic Block
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मध्य रेल्वेने ४ ते १४ ऑगस्टदरम्यान सलग ११ दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवास ठाणे स्थानकापर्यंतच राहणार आहे.