Central Railway : गाड्यांची वाहतूक न थांबवता रात्रकालीन ब्लॉक!

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या अप-डाउन दोन नवीन मार्गिका बांधकामासाठी उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी पनवेल येथे अत्यंत महत्त्वाचे व मोठे कार्य हाती मध्य रेल्वेने हाती घेण्यात आले आहे.
Central Railway Mega Block
Central Railway Mega BlockSakal

मुंबई - डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या अप-डाउन दोन नवीन मार्गिका बांधकामासाठी उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी पनवेल येथे अत्यंत महत्त्वाचे व मोठे कार्य हाती मध्य रेल्वेने हाती घेण्यात आले आहे. हे कार्य करीत असताना उपनगरी गाड्यांची वाहतूक न थांबवता तसेच प्रवाशांना कमीत कमी झळ बसावी म्हणून याचे काम मागील काही दिवसांपासून मध्यरात्री करण्यात येत आहे.

त्यामुळे मध्यरात्री पहाटेची केवळ १ गाडी रद्द तर २ गाड्या शॉर्ट टर्मिनेट व २ शॉर्ट ओरीजनेट करण्यात आल्या असल्याची माहीती मध्य रेल्वेने दिली आहे.

प्रवाशांना कमीतकमी याचा त्रास व्हावा म्हणून शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ११ पासून सोमवार २ आक्टोबर २०२३ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सुट्टी काळातच विनाव्यत्यय करण्याच्या अपरिहार्य कार्यासाठी ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात आला. याबाबतच्याही सूचना विविध प्लॅटफॉर्मसह स्थानकांवर उद्घोषणांच्या द्वारे प्रवाशांना देण्यात आलेल्या होत्या.

एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे हे अत्यंत अवघड कार्य कमी वेळेत पूर्ण करण्याचे आव्हानात्मकरित्या करून दाखविण्याचे यावेळी नियोजित होते. ते पूर्णही करता आले असते, मात्र त्याचवेळी पनवेल येथे मालगाडी रुळांवरून घसरल्यामुळे नियोजनात बाधा आली व त्यामुळे प्रयत्न करूनही हा ब्लॉक नियोजित वेळेत पूर्ण न होता काही तासांसाठी लांबला असे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी दिली.

पनवेल येथील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठीचे हे काम प्रचंड मोठे तसेच अत्यावश्यक असल्याने प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून मध्यरात्री नियोजनबद्ध ब्लॉक घेऊन हे काम करण्यात येत आहे. हे ब्लॉक घेत असताना प्रत्येक वेळी प्रवाशांना विविध माध्यमातून पूर्वसूचना देऊन कळविण्यात येत आहे. प्रवाशांना त्रास होणार नाही यासाठी मध्य रेल्वे नेहमीच प्रयत्नशील असल्याची माहिती मध्य रेल्वेने मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com