भाडे कपातीनंतर एसी लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Central Railway claim Passenger response to AC Local after fare reduction mumbai
भाडे कपातीनंतर एसी लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

भाडे कपातीनंतर एसी लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांनी वातानुकूलित उपनगरीय लोकलला उदंड प्रतिसाद दिला आहे. वातानुकूलित लोकलने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या फेब्रुवारीच्या तुलनेत मे महिन्यात अधिक दिसून येत आहे. फेब्रुवारी मध्ये दैनंदिन सरासरी 5939 प्रवाशांवरून मे मधील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या 26 हजार 815 इतकी वाढली आहे. मध्य रेल्वे वातानुकूलित लोकलसह एकूण 1810 उपनगरीय सेवा चालवते. 14 मे पासून मेन लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, 12 वातानुकूलित सेवा वाढवल्याने मेन लाईनवरील एकूण वातानुकूलित सेवा आठवड्याच्या 44 वरून 56 पर्यंत वाढल्या आहेत.

आता टिटवाळा आणि अंबरनाथ मार्गावरील प्रवासी गर्दीच्या वेळेत वातानुकूलित सेवेचाही लाभ घेता येणार आहे. मध्य रेल्वेने रविवारी आणि नामनिर्देशित सुट्टीच्या दिवशी 14 अतिरिक्त वातानुकूलित सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शहर आणि उपनगरातील वातानुकूलित वाहतूक व्यवस्थेच्या इतर साधनांच्या तुलनेत वातानुकूलित लोकलचा प्रवास सर्वात किफायतशीर झाला आहे. 5 मे पासून एकेरी प्रवासाच्या तिकीट दरात 50 टक्के कपात केल्यानंतर वातानुकूलित लोकलला मिळणारा प्रतिसाद प्रचंड वाढला आहे. 34 किलोमीटर अंतरासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे एका प्रवासाचे भाडे 95 रूपये आहे तर 54 किलोमीटर अंतरासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण 105 रूपये भाडे द्यावे लागते आहे. वातानुकूलित रोड कॅब, टॅक्सी ऑन कॉल घेत असलेल्या 526 आणि 831 रूपये डायनॅमिक भाड्यापेक्षा कमी आहे.

5 ते 15 मे पर्यंतची एसटीची तिकीट विक्री

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - 8171 तिकिटे

  • डोंबिवली - 7534 तिकिटे

  • कल्याण - 6148 तिकिटे

  • ठाणे - 5887 तिकिटे

  • घाटकोपर - 3698 तिकिटे

हार्बेर रेल्वे मार्गावर एसी लोकल अपयशी ठरल्याने 14 एसी लोकलचा भार मेन लाईन वर जबरदस्तीने टाकण्यात आला आहे. त्याचा टिटवाळा, बदलापूरच्या प्रवाशांना कोणताही फायदा नाही. या भागातील 95 टक्के प्रवासी अल्प उत्पन्न गटातील असल्याने त्यांना एसी ट्रेन प्रवास न परवडणारा आहे.

- श्याम उबाळे, सरचिटणीस, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना

Web Title: Central Railway Claim Passenger Response To Ac Local After Fare Reduction Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top