Railway ticket checking
Railway ticket checkingsakal media

मुंबई : तिकीट तपासणीतून मध्य रेल्वेला मिळाला 200 कोटींचा महसूल

मुंबई : लोकल, मेल-एक्स्प्रेस आणि विशेष गाड्यांमध्ये विनातिकीट (Travelling without ticket) अन् अनियमित प्रवाशांविरोधात राबवण्यात आलेल्या तपासणी मोहिमेतून मध्य रेल्वेच्या (central railway) तिजोरीत यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल दोनशे कोटींचा महसूल (two crore collection) जमा झाला आहे. १ एप्रिल २०२१ ते १६ मार्च २०२२ दरम्यान एकूण ३३ लाख ३० लाख प्रकरणे आढळून आली. त्यातून मध्य रेल्वेला २००.८५ कोटींचा महसूल मिळाला आहे. भारतीय रेल्वेच्या (Indian railway) सर्व क्षेत्रीय विभागामधील ही सर्वाधिक प्रकरणे आणि महसूल आहे. कोरोना निर्बंधांच्या काळातही सर्वाधिक कमाई करण्यात आल्याचे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

Railway ticket checking
कल्याण : लोक अदालतमध्ये वाहतूक पोलिस विभागाचे १० हजार ३२८ प्रकरणे निकाली

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची एकूण १२.९३ लाख प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यातून ६६.८४ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमधील सर्वाधिक दंडवसुली मुंबई विभागाकडून करण्यात आली आहे. भुसावळ विभागात विनातिकीट प्रवाशांची एकूण ८.१५ लाख प्रकरणे आढळून आली. त्यातून ५८.७५ कोटी रुपये, नागपूर विभागात ५.०३ लाख प्रकरणांतून ३३.३२ कोटी, सोलापूर विभागात ३.३६ लाख प्रकरणांतून १९.४२ कोटी आणि पुणे विभागात २.०५ लाख प्रकरणांतून १०.०५ कोटी रुपये दंडवसुली झाली.

मुख्यालयाच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट व अनियमित प्रवासाची १.८० लाख प्रकरणे शोधून काढली. त्यातून १२.४७ कोटी रुपयांची वसूल करण्यात आली. प्रवासादरम्यान गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट जवळ ठेवावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

५६,४४३ प्रवाशांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन

आर्थिक वर्षात सर्व विभागांत ५६ हजार ४४३ प्रवाशांवर कोरोना नियमांचे उल्लंघन आणि विनामास्क असल्याने कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८८.७८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com