मध्य रेल्वेकडून मुंबईतील लोकल सुरु करण्याबाबत आली महत्त्वाची बातमी

मध्य रेल्वेकडून मुंबईतील लोकल सुरु करण्याबाबत आली महत्त्वाची बातमी

मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा. याच रेल्वेतून हजारो, लाखो नागरिक एकाच वेळी आपल्या निर्धारित स्थानी प्रवास करत असायचे. मात्र कोरोनामुळे मुंबईतील रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी सुरु आहे. ज्यामध्ये डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी पोलिसांचा समावेश आहे. रेल्वे सुरु झाली तर कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका आहे. म्हणून मुंबईतील उपनगरीय लोकल सेवा अजूनही बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशात विविध संस्था आणि संघटनांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सुरु करावी अशी मागणी देखील होतेय. या पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येतेय. 

मध्य रेल्वेचे डीआरएम गोयल यांनी याबाबत माहिती दिलीये. उपनगरील मध्य रेल्वे लोकल सेवा सुरु करण्याबाबत आम्ही राज्य सरकारवर अवलंबून आहोत. 'राज्य सरकारने मागणी केल्यास लोकल त्वरित सुरु करू', असं मध्य रेल्वेचे DRM गोयल म्हणालेत. या सोबतच कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत रेल्वेवरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळेत बदल करण्याची मागणीही मध्य रेल्वे कडून केली जात असल्याचं समजतंय. मुंबईतील मध्य रेल्वे लोकल सुरु करण्यास आम्ही कधीही तयार असल्याचंही गोयल म्हणालेत. एका मराठी वृत्तवाहिनीमार्फत अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. आधीच लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यात कार्यालये देखील सुरु झाल्याने प्रवासाचा प्रश्न येतोच. अशा संवेदनशील वेळेत अधिकचे पैसे देऊन दररोज प्रवास करणं सामान्यांना परवडणारं नाही. म्हणूनच गेले अनेक दिवस सातत्याने मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्याची मागणी होतेय. 

central railway drm goyal said we are ready to start mumbai local service

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com