esakal | आता एकदाच बुक करा रिक्षा आणि फिरत राहा दिवसभर, आली आहे भन्नाट ऑफर
sakal

बोलून बातमी शोधा

आता एकदाच बुक करा रिक्षा आणि फिरत राहा दिवसभर, आली आहे भन्नाट ऑफर

अनेक मुंबईकर, पुणेकर कॅब ऑन डिमांड म्हणजेच ओला किंवा उबर यासारख्या कंपन्यांच्या सुविधांचा चटकन वापर करण्यावर भर देतात.

आता एकदाच बुक करा रिक्षा आणि फिरत राहा दिवसभर, आली आहे भन्नाट ऑफर

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : अजूनही लॉकडाऊन पूर्णपणे उठलेला नाही. अशात अनलॉच्या दिशेने आपली वाटचाल सुरु आहे. अद्याप मुंबई पुण्यातील बसेस पूर्णपणे आणि मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेन्सही सुरु झालेल्या नाहीत. ट्रेन आणि बसेस जरी पूर्णपणे सुरु झाल्यात तरीही कोरोनाचा संसर्ग ट्रेन आणि बसेसच्या गर्दीतून पुन्हा एकदा डोकं वर काढू शकतो, अशी भीती कायम आहेच.

अशातच अनेक मुंबईकर, पुणेकर कॅब ऑन डिमांड म्हणजेच ओला किंवा उबर यासारख्या कंपन्यांच्या सुविधांचा चटकन वापर करण्यावर भर देतात. अनेकदा आपण या रिक्षा देखील बुक करतो. अशातच उबर कंपनीने आता खास मुंबई, पुणे, शहरांसाठी ऑन डिमांड 24x7 'ऑटो रेंटल्स' सेवा सुरू केली आहे. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे या सुविधेचा वापर करताना, राईड घेताना ग्राहकाला एकापेक्षा जास्त थांबे म्हणजेच हॉल्टस देखील घेता येणार आहेत.  

मोठी बातमी : राज्यातील मंदिरं खुली करण्याबाबत संजय राऊतांचं 'मोठं' विधान, काँग्रेसबाबत राऊत म्हणालेत...

या सुविधेचा उपभोग म्हणजेच राईड घेणाऱ्यांना कमी किमतीत अधिक फायदा होऊ शकतो. एका तास आणि प्रत्येकी १० किलोमीटरच्या प्रवासासाठी उबरकडून केवळ १४९ रुपये आकारले जाणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये एका पेक्षा अधिक तासांचं पॅकेज किंवा जास्तीत जास्त आठ तासांचं पॅकेजही आहे.   

याबाबत बोलताना उबर कंपनीचे मार्केटप्लेस आणि कॅटेगरी हेड नितेश भूषण म्हणालेत की, "तंत्रज्ञानाचा वापर करून सुरु केलेला हा भारतातील असा एक पहिलावहिला आणि नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. यामार्फत चालक आणि ड्रायव्हर्स दोघांनाही याचा फायदा होऊ शकतो. 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, 'ऑटो रेंटल्स' मधून कंपनीच्या सुविधा वापरणाऱ्यांना एकाच फेरीत अनेक थांबे घेता येतील म्हणजेच पुनः पुन्हा नवीन ऑटो बुक न करता या एकाच ऑटोमधून फिरत येणार आहे. 

मोठी बातमी : नाहीतर लोक प्रॉपर्टी चोरुन नेतील, शिवसेनेचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा

या सोबतच कंपनीने काही सेफ्टी फीचर्स देखील लॉन्च केले आहेत. यामध्ये ऑनलाईन चेकलिस्ट, ड्रायव्हर आणि ग्राहकांना बंधनकारक असणारी मास्क पॉलिसी, ट्रिप सुरु करण्याआधी ड्रॉयव्हरने मास्क घातलाय की नाही याची पडताळणी करणं, यासोबतच ग्राहक आणि ड्रायव्हर दोघांना एकमेकांपासून सुरक्षित वाटत नसल्यास राईड रद्द करण्याची सोया उपलब्ध आहे. 

Uber launches Auto rentals in India called on demand 24X7 auto rentals