Mumbai Local Safety: लोकलमधील हाणामाऱ्या, चाकूहल्ल्यांवर डिजिटल नजर; संपूर्ण मध्य रेल्वे ताफा सीसीटीव्हीच्या कक्षेत

लोकलमधील वाढत्या हाणामाऱ्या, चाकूहल्ले, महिलांवरील गैरवर्तन आणि चोरी रोखण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; संपूर्ण लोकल ताफा सीसीटीव्ही कक्षेत आणण्याची मोहीम वेगाने सुरू
CCTV cameras have already been installed in 888 coaches, while the tender process is underway for the remaining 1,306 coaches.

CCTV cameras have already been installed in 888 coaches, while the tender process is underway for the remaining 1,306 coaches.

sakal
Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : गर्दीच्या लोकलमधील प्रत्येक प्रवास हा आता केवळ वेळेशी स्पर्धा राहिलेला नाही, तर सुरक्षिततेचाही प्रश्न बनला आहे. गेल्या काही महिन्यांत हाणामाऱ्या, चाकूहल्ले, मिरची स्प्रे, महिलांशी गैरवर्तन आणि चोरीच्या वाढत्या घटनांनी उपनगरीय रेल्वेतील सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर लोकलमधील प्रत्येक हालचालीवर डिजिटल नजर ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. एकूण २,१९४ डब्यांपैकी ८८८ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित झाले असून, उर्वरित १,३०६ डब्यांमध्ये कॅमेरे बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण लोकल ताफा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com