esakal | मध्य रेल्वेवरील मस्जिद येथे मायक्रो टनेलचे काम पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Micro tunnel

मध्य रेल्वेवरील मस्जिद येथे मायक्रो टनेलचे काम पूर्ण

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वेवरील (Central railway) मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान (Masjid railway station) रेल्वे रुळावर पावसाळ्यात पाणी साचण्याच्या (water logging) घटना घडत होत्या. या समस्येवर रेल्वे आणि महापालिकेद्वारे (BMC) उपाय केला आहे. रेल्वेच्या कोणत्याही फेऱ्यांना किंवा इतर हालचालींना अडथळा न आणता मायक्रो टनेल (Micro tunnel) पद्धतीद्वारे एक हजार मिमी व्यासाचा आरसीसी पाईप (RCC Pipe) टाकण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने (central railway) दिली.

हेही वाचा: गणरायाला आकर्षक फेटा परिधान करण्याचा ट्रेंड वाढला

महापालिका आयुक्त आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या समन्वयाने फेब्रुवारी 2021 मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यात पावसाळ्यात ट्रॅकवर पूर येऊ नये, यासाठी उपाययोजना आखण्यावर चर्चा झाली. मुसळधार पावसामध्ये, भरती, ओहोटीच्यावेळी कल्व्हर्टची अपुरी क्षमता, पाण्याचा निचरा होण्याची कमी क्षमता असल्याने पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचत होते. परिणामी, लोकल, एक्सप्रेस फेऱ्या बंद होऊन प्रवाशांचा प्रवास ठप्प होत होता.

रेल्वे आणि महापालिका यांच्यावतीने एप्रिल 2021 मध्ये पायाभूत कामांना सुरुवात झाली. महापालिकेच्यावतीने नविन आरसीसी पाईप जोडणीचे काम सुरू झाले. हे काम सप्टेंबर 2021 च्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यावर या नव्याने टाकलेल्या आरसीसी पाईप कल्व्हर्टमधून पावसाचे पाणी बायपास केले जाईल. यामुळे रेल्वे परिसरात पावसाचे पाणी जमा होणार नाही. यंदा मध्य रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांद्वारे सँडहर्स्ट रोड आणि दादर-परळ परिसरात मायक्रोटनेलचे काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसराचे उदघाटन; राज्यपाल म्हणाले...

सँडहर्स्ट रोड स्थानकात याचे खूप चांगले परिणाम मिळाले आहेत, जिथे 1 हजार 800 मिमी व्यासाचे आरसीसी पाईप 425 मीटर लांबीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे रेल्वे रुळ ओलांडून जोडण्यात आले होते. मायक्रोटनेलिंग हे एक सिद्ध तंत्रज्ञान आहे. जे मोठ्या प्रमाणावर स्वीकारले गेले आहे. नुकताच सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशन परिसरात प्रकल्प राबविला आहे. मस्जिद रेल्वे स्थानकावरील रेल्वे भागातील सूक्ष्म-बोगद्याचे काम अतिशय कमी कालावधीत पूर्ण झाले आहे. यामुळे पावसाळ्यात मस्जिद रेल्वे स्थानकावर पाणी ओसरण्यास मदत होईल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले.

- पाईपची पातळी निश्चित करण्यासाठी तपशीलवार भौगोलिक सर्वेक्षण.

- भूमिगत अडथळा शोधण्यासाठी सर्वेक्षण.

- बोअर लॉग घेऊन भूवैज्ञानिक सर्वेक्षण.

- जॅकिंग आणि रीसिव्हींग पीटचे बांधकाम.

- एक सूक्ष्म-बोगदा बोरिंग यंत्र संरेखित करणे आणि स्थापित करणे.

- एक हजार मिमी व्यास आरसीसी जॅकिंग मानक पाईप्सची कास्टिंग आणि चाचणी.

- मायक्रो टनेलिंग बोरिंग मशीनद्वारे आरसीसी जॅकिंग पाईप टाकणे.

loading image
go to top