

Kisan Rail
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : शेतकऱ्यांचा नाशवंत शेतमाल देशाच्या विविध बाजारपेठांपर्यंत जलद आणि सुरक्षित पोहोचविण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या देवळाली-दानापूर 'शेतकरी समृद्धी' विशेष किसान रेल सुरू केली; मात्र त्यामध्ये शेतमाल दुय्यम ठरल्याचे धक्कादायक चित्र उघड झाले आहे. १५ ऑक्टोबर २०२४पासून ३ सप्टेंबर २०२६पर्यंत झालेल्या ९७ फेऱ्यांत १३ हजार ७७८.४९ टन मालाची वाहतूक झाली. त्यापैकी केवळ ५ हजार ३४५.३४ टन म्हणजे ३९ टक्के माल नाशवंत शेतमालाचा आहे. उलट, ८ हजार ४३३.१५ टन म्हणजे ६१ टक्के माल व्यापारी पार्सलचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या या सेवेवर व्यावसायिक पार्सलचा वरचष्मा आहे.