रेल्वेच्या मालवाहतुकीला चालना देण्यासाठी भिवंडी रोड स्टेशनातून 28 हजारांच्या पार्सल पॅकेजेसची पुरवणूक

भाग्यश्री भुवड
Monday, 21 September 2020

भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर मालवाहू पार्सल गाड्या आणि मालगाड्या हाताळण्यासाठी नवीन पार्सल व गुड्स शेड उघडण्यात आले.

मुंबई, 20: क्षेत्रिय आणि विभागीय स्तरावर रेल्वेने उभारलेल्या बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट (बीडीयू) चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेने उद्योगाला अखंड आणि परवडणारी कनेक्टिव्हिटी देऊन फ्रेट आणि पार्सल लोडिंगला चालना देण्यासाठी बराच पुढाकार घेतला आहे. भिवंडी रोड स्थानक माल (गुड्स) आणि पार्सल बुकिंगसाठी सुरु करणे हा बीडीयूने रेल्वेच्या मालवाहतुकीला चालना देण्यासाठी घेतलेला पुढाकार आहे.

भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर मालवाहू पार्सल गाड्या आणि मालगाड्या हाताळण्यासाठी नवीन पार्सल व गुड्स शेड उघडण्यात आले. या उपक्रमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या पार्सल ट्रेनमध्ये 1-09-2020 रोजी एकूण 86.85 टन पार्सल पाठवण्यात आले. त्यानंतर 13-09-2002 रोजी 111.40 टन पार्सल पाठवण्यात आले. 16-09-2020 रोजी 122.70 टन पार्सल पाठवले. 18-09-2020 रोजी 106.48 टन पार्सल पाठवले. हे किसान रेल्वेला जोडून पुढे दानापूर/पाटणा येथे पाठवले गेले.

महत्त्वाची बातमी बल्ले बल्ले करत व्यक्त केला आनंद, 106 वर्षीय आजींनी कोरोनाला हरवले

गोदरेज, ओनिडा, एलजी, बजाज, पार्ले-जी, हिंदुस्तान लिव्हर, डेल-मोंटे इत्यादी लोकप्रिय ब्रँडची फर्निचर, रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, खाद्य उत्पादने, औषधी आणि सौंदर्यप्रसाधने यांचा समावेश असलेल्या एकूण 28,524 पॅकेजेस 427.43 टन वजनाच्या उत्पादनांची भिवंडी रोड स्थानकातून देशाच्या विविध भागात वाहतूक केली गेली.

माल आणि पार्सल वाहतुकीसाठी भिवंडी रोड स्टेशन उघडण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की मुंबई आणि ठाणे शहरांच्या जवळ, उत्तर-दक्षिण आणि जेएनपीटी बंदराशी रेल्वे द्वारे अधिक चांगले संपर्क, आवश्यक गोदाम आणि ई-कॉमर्स सुविधा आणि ट्रक आणि टेम्पोसाठी पार्किंगची पुरेशी जागा या सुविधा येथे आहेत. हे केवळ रेल्वे उत्पन्नाला चालना देणारेच नाही तर स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासही मदत करेल.

( संपादन - सुमित बागुल )  

central railways starts twenty eight thousand parcel wagon from bhiwandi road station


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central railways starts twenty eight thousand parcel wagon from bhiwandi road station