सावधान...मुंबईत एस्काॅर्टच्या नावाने फोफावतोय वेश्याव्यवसाय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

एका टोळीची पाळेमुळे उद्‌ध्वस्त; ऑनलाईन वेश्‍याव्यवसायाचे आव्हान

मुंबई : एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावावर वेश्‍याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने बेड्या ठोकल्या, नंतर या कथित एस्कॉर्ट सर्व्हिसचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून वरचेवर अशा ऑनलाईन साईट ब्लॉक केल्या जातात. मात्र या टोळ्या नव्याने रोज नवी संकेतस्थळे सुरू करतात, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

त्याने बिस्कीटच्या आमिषाने तिला घरात नेलं, आणि...

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेने गेल्या काही महिन्यांपासून कारवाई करत, अशाप्रकारे एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्‍याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीची पाळेमुळे खोदून काढली आहेत. आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून म्होरक्‍यासह दोघे फरारी आहेत. या टोळीकडून 17 लाख 15 हजार रुपये, तीन कार, पासपोर्ट, श्रीलकंन चलन, 7 सिम कार्ड,2 क्रेडिट कार्डसह, विमानाची तिकिटेही जप्त करण्यात आली आहेत. 13 फेब्रुवारी रोजी गॉडविन विल्सन महेंद्रन या पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली. याबाबत पुढील तपास सुरू आहे. त्याचबरोबर हे संकेतस्थळ बंद करण्याची शिफारस संबंधितांना करण्यात आली आहे, असे समाजसेवा शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले यांनी सांगितले. 

मंत्र्यांच्या बैठकीआधी नवाब मलिक यांचं 'मोठं' वक्तव्य, म्हणालेत... 

परदेशातून किंवा परराज्यातून व्यावसायिक कामासाठी येणाऱ्या व्यक्तींना मदत व्हावी म्हणून शहरातील मदतनीस म्हणजे एस्कॉर्ट असतो. मात्र, भारतासह अनेक देशांमध्ये एस्कॉर्ट सर्व्हीसच्या नावाखाली सर्रास वेश्‍याव्यसाय सुरू आहे. संकेतस्थळावर तरुणींचे छायाचित्र दाखवून ग्राहकांना आकर्षित केले जाते. व्हॉट्‌सऍपवरून सौदा निश्‍चित केला जातो. असा हा सर्व खेळ आहे. "यातील अनेक संकेतस्थळे वेळोवेळी ब्लॉक केली जातात, पण रोजच नवीन संकेतस्थळे सुरू होतात. त्यामुळे कारवाईला मर्यादा येतात, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 

तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; यंदाची महाशिवरात्र असणार विशेष...

वयानुसार ठरतो दर 
महिलेच्या वयानुसार एस्कॉर्ट सर्व्हिसचा दर ठरतो. यात काही तासांसाठी 5 ते 7 हजारांपासून 25 हजार आणि संपूर्ण रात्रीसाठी 25 हजारांपासून 50 हजार रुपये असतात. 

असा साधतात संपर्क 
संकेतस्थळावर संपर्क मोबाईल क्रमांक दिला जातो. त्यावरून फक्त व्हॉट्‌सऍप मेसेज किंवा कॉल स्वीकारला जातो. तसेच त्यांचे हॉटेल्सही ठरलेले असतात.

The Challenge of Online Prostitution


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Challenge of Online Prostitution