शिवसेनेबाबत भाजप प्रचंड आशावादी, खुद्द चंद्रकांत पाटील म्हणतात..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

शिवसेनेबाबत भाजप प्रचंड आशावादी आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. काल शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी "कोण म्हणतं शिवसेना आणि भाजप भविष्यात कधीच एकत्रित येणार नाही ?" असं वक्तव्य केलं होतं. आता याचा वक्तव्यावरून भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

शिवसेनेबाबत भाजप प्रचंड आशावादी आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. काल शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी "कोण म्हणतं शिवसेना आणि भाजप भविष्यात कधीच एकत्रित येणार नाही ?" असं वक्तव्य केलं होतं. आता याचा वक्तव्यावरून भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

महत्त्वाची बातमी : मनोहर जोशी यांचं 'ते' वक्तव्य म्हणजे पक्षाची भूमिका नव्हे - डॉ नीलम गोऱ्हे
 

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनोहर जोशींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आणि शिवसेना हे एकमेकांचे नैसर्गिक मित्र आहेत. ही मैत्री एक दोन वर्षांची नसून तब्बल तीस वर्षांची आहे. आम्ही आशावादी आहोत. पुन्हा एकत्र यावं म्हणून लोकांनी दोघांना जनादेश दिला होता. आम्ही आशावादी आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मनोहर जोशींना जर शिवसेना आणि भाजपने एकत्रित यावं असं वाटत असेल तर त्याचं स्वागत आहे. चर्चेची दारं त्यावेळी देखील खुली होती. आम्हाला अजिबात अहंकार नाही. दरम्यान मी केवळ हा आशावाद व्यक्त करतोय असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी : कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याच्या हालचालींना वेग..

महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलंय. यात शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांनी अजूनही शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष नैसर्गिकदृष्ट्या एकत्र असावेत, अशी इच्छा प्रकट केली आहे.

दरम्यान ज्येष्ठ पिढीच्या या भावना त्यांच्या मनात राहणे स्वाभाविक असल्याची प्रतिक्रया डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय. सध्याचा भाजपचा मार्ग आणि व्यवहार सहकारी मित्र पक्षांना संपवण्यासाठी असल्याने त्या मार्गाला स्विकारणे शिवसेनेला शक्य नाही. म्हणूनच मनोहर जोशींचे वक्तव्य म्हणजे शिवसेनेची भुमिका नाही असे भूमिका शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलंय.

Webtitle : chandrakant patil on shivsena and bjp re alliance    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrakant patil on shivsena and bjp re alliance