esakal | कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याच्या हालचालींना वेग..
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याच्या हालचालींना वेग..

कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याच्या हालचालींना वेग..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या दिवसापासून कामाचा धडाका लावलाय. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने कर्जमाफी संदर्भात माहिती घेण्याचं काम ठाकरे सरकारकडून करण्यात येतंय. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांसाठीची सर्वात मोठी बातमी कधीही येऊ शकते.

महाराष्ट्रात पडलेला सुका दुष्काळ आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी भोगलेला ओला दुष्काळ, यामुळे शेतकऱ्याचं पुरतं कंबरड मोडलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी सुरवातीपासून शेतकऱ्यांच्या मुद्द्याला प्राधान्य यादीत ठेवलंय. 

असा झाला 'सोशल' सामना :  2019 मध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात अशीही होती स्पर्धा..

आता याच शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावर सूत्र हलताना दिसतायत. येत्या काही दिवसात शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय देखील येऊ शकतो. कर्जमाफी संदर्भातील निर्णयाला वेग आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय. कारण, शेतकरी कर्जमाफीच्या दिशेने उद्धव ठाकरे सरकारच्या विशेष हालचाली सुरु आहेत. याचबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बँकांचे अधिकारी, अर्थ विभागाचे सचिव  यांच्यासोबत बैठक घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय. 

महत्त्वाची बातमी :  'कॅब'बद्दल स्पष्टता हवी, आंधळेपणाने समर्थन नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी शपथ घेतल्या-घेतल्या आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिवांकडून शेतकरी कर्जमाफीबद्दलचं वास्तव काय आहे याची माहिती मागवली. यानंतर पुढील काही बैठकांमध्ये सातत्याने शेतकरी कर्जमाफी कशा प्रकारे दिली जाऊ शकते याबद्दल बैठका झाल्याची माहिती समोर आली. आज उद्धव ठाकरे यांनी घेतल्याला बैठकांमधून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसोबतच  शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे असं सूत्रांकडून सांगितलं जातंय. 

WebTite : uddhav thackeray took meeting with bank officials regarding farmers loan wavier

loading image
go to top