Vidhan Sabha 2019 : मुंबईत भाजपमध्ये राडा; घाटकोपर पूर्वमध्ये उमेदवाराच्या गाडीवरच हल्ला

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

घाटकोपर पुर्व मधून सहा वेळचे आमदार प्रकाश महेता यांचे तिकट कापल्याने कार्यकर्तयांचा उद्रेक झाला. उमेदवार पराग शहा यांच्या गाडीची तोडफोड कार्यकर्त्यांनी केली.

मुंबई : घाटकोपर पुर्व मधून सहा वेळचे आमदार प्रकाश महेता यांचे तिकट कापल्याने कार्यकर्तयांचा उद्रेक झाला. उमेदवार पराग शहा यांच्या गाडीची तोडफोड कार्यकर्त्यांनी केली. त्यावेळी तेथे माजी खासदार किरीट सोमय्याही उपस्थित होते. 

Vidhan Sabha 2019 : भाजप विधानसभा जिंकणार?; मोदींसह अनेक दिग्गज स्टार प्रचारक!

एसआरए घोटाळ्याचा आरोप असल्याने प्रकाश मेहता यांचे तिकीट कापण्यात आले, त्यामुळे महेता अपक्ष अर्ज भरतील अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे पराग शहा महेता यांची भेट घेण्यासाठी गेले. त्यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी शहा यांची गाडी फोडली. किरीट सोमय्या यांनीी कार्यकर्त्यांना विनंती केली मात्र त्यांनाही जुमानले नाही. अखेरीस महेता यांनी शहा यांची गाडी बाहेर काढण्यास मदत केली. 

Vidhan Sabha 2019 : नाशिक जिल्हा : महायुतीसमोर नाराजी रोखण्याचे आव्हान

एकेकाळी मुंबई भाजपचे अध्यक्ष राहिलेल्या प्रकाश मेहता यांना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण खात्याची जबाबदारी मिळाली होती. पण, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. तात्कालीन विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पुढे, विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडेच मेहता यांच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chaos in Ghatkopar between BJP party workers