मृतदेह शवागारात नव्हता म्हणून मित्राने विचारपूस केली, तर डॉक्टर म्हणाले तो तर...

मृतदेह शवागारात नव्हता म्हणून मित्राने विचारपूस केली, तर डॉक्टर म्हणाले तो तर...

मुंबई - रेल्वेत कामाला असलेल्या 50 वर्षीय इसमाचा रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र, त्यांचा मृतदेह अदलाबदली झाल्याने नातेवाईकांमध्ये एकच गोंधळ उडाला. आधीच कोरोनाची धास्ती वाढत असताना अंत्यसंस्कारासाठी ही शव न मिळाल्याने नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण होते. अखेर दोन्ही मृतदेहांवर दादर येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले. मात्र, यातून रेल्वे रुग्णालयात मृतदेहांच्या वैशिष्ट्यासह नोंदी होत नसल्याचे समोर आले. 

मृत व्यक्ती दादर येथे राहणारी होती. छातीत त्रास जाणवू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना रेल्वेचे बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले गेले. त्या ठिकाणी त्यांना अँजिओग्राफी, 2डी इको करण्यास सुचवले. औषधोपचाराने बरे वाटेल असे देखील सुचवले. मात्र, 5 तारखेला अधिक त्रास सुरु झाल्याने ती मृत व्यक्ती आणि धाकटा भाऊ, पत्नीला ताप आल्याने सगळे रुग्णालयात गेले. 

यावेळी मात्र मृत व्यक्तीला रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात दाखल होण्यास सुचवले गेले. त्यांची कोरोना चाचणी केली असता पॉझिटीव्ह आली. त्यांच्यावर जगजीवनराम या रुग्णालयात उपचार सुरु झाले.

6 मे रोजी ते खाटेवरुन खाली पडले. पोटावर पडल्याने त्यांना कार्डीयाक अरेस्ट येऊन मृत पावले. तसा मेसेज त्यांच्या नातेवाईकांना दिला. 7 मे रोजी सकाळी या मृताचा भाऊ आणि मित्र रुग्णालयात दाखल झाले. प्रत्यक्षात मृतदेह घेताना मात्र शवागारात नसल्याचे दिसून आले. प्रसंगावधान राखणाऱ्या मित्राने डॉक्टरांकडे चौकशी केली असता मृतदेह दुसऱ्यांनी नेला असल्याची कबूली दिली.

मृतदेहाची शोधाशोध सुरु झाल्यावर मृतदेह दादर स्मशानभूमीत नेला असल्याचे समजले. अखेर सगळे नातेवाईक आणि डॉक्टर स्मशान भूमीत दाखल झाले. तिथेच त्यांच्यावर अंत्य संस्कार केले. याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. दरम्यान, या झालेल्या गोंधळाविषयी रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयाशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

chaos by hospital handover patients body to wrong family

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com