शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना छात्रभारतीने पाठवला काळा आकाश कंदील

संजय शिंदे
Saturday, 14 November 2020

गेल्या 20 वर्ष पासून विनाअनुदानित शिक्षकांना, विद्यार्थ्यांना फसवत असल्याने आपला निषेध म्हणून काळा आकाश कंदील पाठवला - छात्रभारती 

मुंबई, ता. 14 : गेली 20 वर्ष झाली महाराष्ट्र शासनाच्या विनाअनुदानित धोरणामुळे राज्यातील हजारो शिक्षक आत्महत्या करत आहेत. परंतु सरकारला अजून ही पाझर फुटत नाही. केवळ लॉकडाऊनमध्ये 60 पेक्षा जास्त शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु सरकारला विनाअनुदानित शिक्षकांचे काहीही घेणं देणं दिसत नाही, असा आरोप करत आज छात्रभारतीने शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांना दिवाळी निमित्त काळा कंदील भेट म्हणून दिला आहे.  

महत्त्वाची बातमी : "माझं खासगी आयुष्य तिथेच संपलं", मुलाखत देताना संजय राऊत झालेत भावनिक

यावेळी छात्रभारतीने सरकारवर अनेक आरोप केलेत. शिक्षण विभागाकडून शिक्षकांना केवळ खोटी आश्वासने देण्यात येतात. "शिक्षकांनी खितीही आंदोलने केलीत तरीही शासनाला पाझर फुटत नाही आणि कायम शिक्षकांची खोटी समजूत काढली जाते. हा खेळ गेली 20 वर्षांपासून सुरूच आहे. शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि ते मोफतच दिले पाहिजे. परंतु सरकार राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा धडधडीत बंद करत आहे. गोरगरिबांचे शिक्षण संपवण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. विनाअनुदानित धोरणामुळे अनेक शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या असतानाही सरकार थोडेही संवेदनशील होत नाही".   

महत्त्वाची बातमी : ७३ वर्षांनंतर मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या शिवाजी पार्कच्या नावात बदल

असे अनेक आरोप करत सरकारच्या धोरणांचा आणि सरकारचा संघटनेतर्फे निषेध करण्यात आला आहे. सरकारने याप्रश्नी गांभीर्याने विचार करावा नाहीतर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत शासनाचा निषेध म्हणून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना काळा आकाश कंदील पाठवण्यात आला आहे.

chatra bharati sends black dowali lantern to school education minister varsha gaikwad


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chatra bharati sends black dowali lantern to school education minister varsha gaikwad