उच्चशिक्षित तरुणाकडून लग्नाच्या बहाण्यानं तब्बल १६ तरुणींची फसवणूक

wedding
wedding

मुंबई : लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणींना तसंच घटस्फोटीत महिलांना जाळ्यात अडकवून फसवणूक करणाऱ्या ३५ वर्षीय भामट्याला नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी पालघरमधून अटक केली आहे. या भामट्यानं तब्बल १६ तरुणी आणि महिलांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. सचिन सांबरे असं आरोपीचं नाव आहे. एका महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर सांबरे ठाण्यात दुसऱ्या पत्नीसोबत राहत होता. त्याने विविध मॅट्रिमोनियल साइटवर प्रोफाइल बनवले होते आणि एमएनसीसाठी काम करणारा बॅचलर असल्याचा दावा केला होता. सचिननं वेगवेगळ्या मॅट्रिमोनियल साइटवर स्वत:च्या नावाची नोंदणी केली होती. तो लग्नास इच्छुक असणाऱ्या तरुणींशी संपर्क साधायचा. लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची तक्रार एका वकील महिलेने रबाळे पोलिसांकडे केली होती. काही दिवस डेटिंग केल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला, अशी तक्रार महिलेनं पोलिसांकडे केली होती. त्यावरून रबाळे पोलीस तपास करत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर यांना संशयित तरुणाची माहिती मिळाली होती. 

वकिल महिलेनं त्याच्या बद्दलची चौकशी केली असता तिला समजले की, त्यानं यापूर्वी 16 महिलांची फसवणूक केली आहे आणि त्यांचे लैंगिक शोषण केले आहे, त्यानंतर तिने तक्रार दाखल केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पालघरच्या दहरेंजा गावात सापळा रचला होता. यावेळी निंबाळकर यांच्या पथकाने दहरेंजा येथून सचिन पाटील उर्फ सचिन सांबरे याला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक केली असता, चौकशीत अधिक धक्कादायक माहिती समोर आली. 

सचिनने मागील वर्षभरात २५ हून अधिक महिलांची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे. त्यापैकी १५ हून अधिक तक्रारी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहेत. केवळ वासनेतूनच तो त्याने मुलींना फसवल्याची कबुली सचिननं पोलिसांकडे केली आहे. दरम्यान,  रबाळे पोलिस अधिक तपास करताहेत.

Cheating of 16 young women under the pretext of marriage by a highly educated youth

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com