esakal | महाराष्ट्रासह १२ राज्यांतील तपासणी नाके बंद होणार ?
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

महाराष्ट्रासह १२ राज्यांतील तपासणी नाके बंद होणार ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra) मध्य प्रदेश (Madhya Pradesh) , पश्चिम बंगाल, बिहार, केरळ (Kerala), तेलंगणा, आंध्र प्रदेश, पाँडेचेरी, गोवा (Goa) , उत्तराखंड, छत्तीसगड, राजस्थान (Rajastan) या राज्यांतील सीमा तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

वाहन आणि सारथी प्रणालीवर वाहनांची ऑनलाईन सर्व माहिती असताना वाहतूकदारांच्या कागदपत्र तपासणीसाठी तपासणी नाक्यांची गरज काय, असा प्रश्न उपस्थित करत केंद्राने तपासणी नाकी बंद करण्याचे आदेश दिल्याचे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे; मात्र राज्याच्या परिवहन विभागाला अद्याप अधिकृत ई-मेल आला नसल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: गणरायाच्या आगमनासोबतच राज्यभरात पावसाचेही पुनरागमन

राज्यभरात आज समाजमाध्यमांवर केंद्राच्या एका निर्णयाची जोरदार चर्चा होत होती. सीमा तपासणी नाकी बंद करण्याचा निर्णय केंद्राने घेतला असून, त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असल्याचा उल्लेख त्या पत्रात केला आहे. तपासणी नाक्यांवर कागदपत्रांमध्ये चुका किंवा प्रचलित पद्धतीनुसार अवैध वसुली केली जात असल्याचा वेळोवेळी वाहतूकदारांकडून आरोप करण्यात आला होता.

loading image
go to top