esakal | गणरायाच्या आगमनासोबतच राज्यभरात पावसाचेही पुनरागमन
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

गणरायाच्या आगमनासोबतच राज्यभरात पावसाचेही पुनरागमन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गणरायाच्या आगमनासोबतच राज्यभरात पावसाचेही (Rain) पुनरागमन झाले आहे. त्यामुळे ऐन गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशीच भाविकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसली. त्यात पुढील ४ ते ५ दिवस पावसाचा जोर वाढणार असून रविवार (Sunday) ते मंगळवार (Tuseday) दरम्यान मुंबईत (Mumbai) मुसळधार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या ४८ तासांत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. येत्या २,३ दिवसांत हे क्षेत्र पश्चिम व वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आज हवामान केंद्राने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात येत्या ४ ते ५ दिवसांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामा विभागाचे के. एस. होमाळीकर यांनी व्यक्त केली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असून अधूनमधून तीव्र सरी पडण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा: केंद्र सरकार मतांसाठी अफगाणिस्तान मुद्द्याचाही वापर करेल - काँग्रेस

पावसाचा सर्वाधिक परिणाम हा उत्तर कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. विशेषतः १२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे; तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देखील प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

loading image
go to top