Chembur School Mehndi Controversy
esakal
हातावर मेहंदी काढल्याने चेंबूर येथील सेंट ॲन्थोनी गर्ल्स हायस्कूलने १५ ते २० विद्यार्थिनींना थेट वर्गाबाहेर काढल्याचा प्रकार उघड झाला आहे. आपल्या शाळेची नियमावली दाखवून त्यांचे हात तपासून वर्गाबाहेर काढले. यामुळे याविरोधात पालकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने या प्रकाराची तत्काळ दखल घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिकेला नोटीस बजावून एका दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.