Danger :: मुंबईतील 'या' भागातील मृत्यूदर जगाच्या दुप्पट तर देशाच्या तीप्पट...

Danger :: मुंबईतील 'या' भागातील मृत्यूदर जगाच्या दुप्पट तर देशाच्या तीप्पट...

मुंबई : मुंबईतील एम पश्‍चिम चेंबूर विभागाचा कोविड मृत्यूदर हा 10.47 टक्के आहे. तर जगाचा मृत्युदर हा 5.4 % आणि देशाचा 3 टक्के इतका आहे. मुंबईचा मृत्यूदर 5.81 टक्‍क्‍यांपर्यंत पोहचला आहे. या मृतांमध्ये वय वर्ष 50 पेक्षा वरच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. वांद्रे पुर्व, डोंगरी, वरळी-प्रभादेवी, दादर धारावी  हे सर्वाधिक मृत्यूदर असलेले पहिले पाच विभाग आहेत.

महानगर पालिकेकडून रोज प्रभाग निहाय कोविड रुग्णांची आकडेवारी, एकूण रुग्ण, आजारातून बरे झालेले रुग्ण आणि उपचार असलेले रुग्ण या पध्दतीने दिले जाते. मात्र, यात प्रभागनिहाय मृतांची आकडेवारी दिली जात नाही. त्यामुळे उपचार सुरु असलेले रुग्ण आणि आजारातून बरे झालेल्या रुग्ण संख्यंची बेरीज करुन त्यातून एकूण रुग्णांची संख्या वजा करुन मृतांचा आकडा काढण्यात आला आहे. 

जून महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत मुंबईचा मृत्यूदर 3 ते 4 टक्‍क्‍यांदरम्यान होता. मात्र, नोंदीत नसलेल्या 800 हून अधिक कोविड मृतांची नोंद झाल्यानंतर हा दर 5.67 टक्‍क्‍यांवर पोहचला आहे. शहरातील सर्वाधिक मृत्यूदर हा चेंबूर विभागात आहे. चेंबूर विभागात 27 जुन पर्यंतच्या नोंदी नुसार 2 हजार 336 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 1 हजार 453 रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. तर, 615 रुग्णांवर उपचार सुरु असून 242 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 90 टक्के मृत्यू हे इतर दिर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांचे आहेत. त्यातही 50 वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, आता कोविडवर नियंत्रण मिळवले जात असून रुग्णवाढीचा दर 1.1 टक्के आणि रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 60 टक्‍क्‍यांवर पोहचला आहे.

चेंबूर पाठोपाठ एच पुर्व म्हणजे वांद्रे, खार, सांताक्रुझ पुर्व विभागात 8.22 टक्के मृत्यूदर आहे. या भागात झोपडपट्ट्यांचे प्रमाण जास्त असून झोपडपट्यांमधील मृत्यू जास्त असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

सर्वाधिक मृत्यूदर असलेले विभाग 

विभाग --- मृत्यूदर - एकूण रुग्ण -- मृत्यू 

  • एम पश्‍चिम चेंबूर - 10.47----2310---242 
  • एच पुर्व वांद्रे पुर्व - 8.22---3441--282 
  • बी डोंगरी,उमरखाडी - 8.02--748---60 
  • जी दक्षिण वरळी परळ - 7.20---3441---283 
  • जी उत्तर दादर माहिम धारावी - 7.11---4370---187 
  • एफ उत्तर दादर माटूंगा पुर्व शिव वडाळा -- 7.10--3323--236 

सर्वात कमी मृत्यूदर असलेले प्रभाग 

विभाग --- मृत्यूदर - एकूण रुग्ण -- मृत्यू 

  • सी चंदनवाडी - 2.16---1017---22 
  • ए कुलाबा - 2.22---1754---39 
  • आर दक्षिण कांदिवली - 2.58 ----2635---68 
  • टी मुलूंड - 2.88 ---2336----65 
  • आर उत्तर दहिसर - 3.06 ----1572---48 

वयोगटानुसार मुंबईतील मृत्यू  ( 27 जानेवारीच्या नोंदीनुसार - 4282 ) 

वयोगट - मृत्यू 

  • शून्य ते 10 -7 
  • 11 ते 20 --14 
  • 21 ते 30--195 
  • 41 ते 50--565 
  • 51 ते 60 --1187 
  • 61--70--1255 
  • 71 ते 80 --- 691 
  • 81 ते 90 -- 271 
  • 91 ते 100 - 30 
  • 100 च्या पुढे - 1 

chemburs covid19 death rates is double than worlds death rate and triple than indias death rate

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com