विमानतळावर तपासणीसाठी मुबलक तपासणी काउंटर नसल्याने प्रवाशांची गर्दी

विमानतळावर तपासणीसाठी मुबलक तपासणी काउंटर नसल्याने प्रवाशांची गर्दी

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) प्रवाशांच्या तुलनेत मुबलक कोविड तपासणी काउंटर नसल्याने प्रवाशांना रांगा लावाव्या लागत आहे. बाहेर राज्यातून मुंबई विमानमार्गाने दाखल होणाऱ्या प्रवाशांना 72 तासात आरटीपीसीआर तपासणी अनिवार्य करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांना रांगा लावाव्या लागत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

विमानतळावर मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत विमानतळावर कोविड तपासणी सेवा देणे अपेक्षित होती. मात्र, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) मार्फत खासगी कर्मचाऱ्यांमार्फत प्रति प्रवासी 1400 रुपये घेऊन विमानतळावरील प्रवाशांची कोविड तपासणी करत आहे. यादरम्यान एकाच वेळी विमानतळावर विविध राज्यातील विमान उतरल्यास प्रवाशांची विमानतळाच्या लॉबीमध्ये गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो आहे.

शिवाय प्रवाशांना विमानातून उतरल्या नंतर आपल्या घरी किंवा निश्चित ठिकाणी जाण्याची घाई असतानाही  कोविड तपासणीसाठी रांगा लावाव्या लागत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
इंटरनॅशनल विमानतळावर मुंबईकरांची आर्थिक लूट केली जात असून ही लूट बंद करण्यात यावी. मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत ही तपासणी मोहीम राबवायची असताना, खासगी कंपनी प्रति प्रवासी 1400 रुपये घेत 24 तासानंतर तपासणी अहवाल देण्यात येणार असल्याचे सांगून प्रवाशांना घरी पाठवल्या जात आहे. प्रवाशांची लूट आणि मुंबईकरांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ बंद करण्यात यावा.
सुभाष गुप्ता, अध्यक्ष, यात्री संघ मुंबई 
 
विमानतळावरील चाचण्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड करतंय. प्रवाशांच्या आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात येत असून चाचणी अहवाल 24 तासात दिला जातो. प्रवाशांना थांबण्याची गरज नाही. गर्दी होऊ नये त्यासाठी काउंटरची संख्या 2 वरून 8 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 
सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मनपा

--------------------

(संपादन- पूजा विचारे)

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport passenger Crowd covid inspection

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com