

Chitra Wagh On Arnav Khaire Suicide Case
ESakal
डोंबिवली : अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडत असताना भाजप नेत्या व आमदार चित्रा वाघ यांनी आज खैरे कुटुंबाची भेट घेऊन या संपूर्ण घटनेबाबत संताप व्यक्त केला. “अर्णव हा भाषा-विषयक विषारी राजकारणाचा पहिला बळी आहे. तुमच्या मुलांच्या राजकीय भविष्याचा पाया रचण्यासाठी एका मराठी मुलाचा बळी घेणार का?” असा सवाल त्यांनी नाव न घेता ठाकरे बंधूंवर करत हल्लाबोल केला.