छोटा राजनचा दाऊदला मारण्याचा प्लॅन फसला; कोण बनला फितूर?

chota rajan planned to kill dawood ibrahim said ijaz lokhandwala
chota rajan planned to kill dawood ibrahim said ijaz lokhandwala

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला १९९८ मध्येच मारण्याची योजना छोटा राजनने बनवली होती. मात्र, दाऊदचा जुना सहकारी मिर्झा दिलशाद बेग याने दाऊदला आमची योजना सांगितली अन् आमची दाऊदला मारण्याची योजना फसली, असा खुलासा कुख्यात गुंड एजाज लकडावाला याने पोलिस चौकशी दरम्यान केला आहे.

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पाटणा येथील विमानतळावरून लकडावालाला ताब्यात घेतले होते. सध्या त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशी दरम्यान त्याने पोलिसांना ही माहिती दिली. या वेळी तो म्हणाला, की आम्ही भारतीय गुप्तचर संस्थेच्या साथीने १९९८ मध्ये दाऊद इब्राहिमला मारण्याची योजना बनवली होती. यासाठी विकी मल्होत्राने एक टीम तयार केली होती. त्या टीममध्ये मी देखील होतो. माझ्या व्यतिरिक्त यामध्ये फरीद तानाशा, बाळू डोकरे, विनोद मतकर, संजय घाटे आणि बाबा रेड्डी यांचाही समावेश होता. दाऊदची मुलगी मारिया हिच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीसाठी दाऊद कराचीतील एका दर्ग्यात येणार होता. त्या वेळी त्याला ठार करण्यासाठी आम्ही तयार होतो, असे लकडावालाने पोलिसांना सांगितले. मात्र, आम्ही त्या दर्ग्याजवळ जाणार तेवढ्यात छोटा राजनने आम्हाला फोन करून आपली योजना दाऊदला समजली असल्याचे सांगत आम्हाला ती जागा सोडून जाण्यास सांगितले. यानंतर पुढच्या दोन दिवसांत पाकिस्तान पोलिसांनी आम्ही ज्या फ्लॅटवर राहणार होतो तिथे छापा टाकला आणि फ्लॅटवरील सर्व शस्त्रे जप्त केली, असे लकडावालाने पोलिसांना सांगितले.

दाऊदचा जवळचा सहकारी आणि नेपाळचा खासदार असलेल्या मिर्झा दिलशाद बेग याने दाऊदला शेवटच्या क्षणी आमच्या कटाची माहिती दिल्याचे आम्हाला समजले होते. त्यामुळेच आमचा दाऊदला ठार करण्याचा प्रयत्न फसला. आमच्या अयशस्वी प्रयत्नानंतर छोटा शकीलने आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता, असेही त्याने या वेळी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com