esakal | कोरोना रोखण्यासाठी ख्रिस्ती समुदाय करणार उपवास आणि प्रार्थना
sakal

बोलून बातमी शोधा

Archbishop Father

कोरोनाला पळवण्यासोबतच कोविडवरील उपचारांसाठी आर्चबिशपांचे प्रयत्न

कोरोना रोखण्यासाठी ख्रिस्ती समुदाय करणार उपवास आणि प्रार्थना

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार (मुंबई): वसई ख्रिस्ती धर्मप्रांताचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, बसीन कॅथॉलिक सहकारी बँक आणि कार्डिनल ग्रेशर्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने देवतालाव येथील फादर बर्नड भंडारी सभागृहात लवकरच कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कोविड सेंटर सुरु करण्यात येत आहे. तसेच कोरोना निराकरणासाठी ख्रिस्ती समुदायातर्फे 7 मे रोजी (शुक्रवारी) देशव्यापी उपवास आणि प्रार्थना करण्यात येणार आहे, अशी माहिती वसईच्या बिशप्स हाऊसकडून देण्यात आली. वसई विरार धर्मग्रामातील सर्व ख्रिस्ती समाजाने त्यात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहनही करण्यात आले आहे. (Christian Community to do fasting Prayers to stop Corona Epidemics)

हेही वाचा: IPL च्या संघात संधी देतो सांगून मुंबईकर तरूणाची फसवणूक

वसई ख्रिस्ती धर्मप्रांताचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी याबाबत दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, जगभर कोरोना महामारीने लोक मरत आहेत. भारतातही परिस्थिती भयावह बनली आहे. यात प्रत्येकाचे स्वतःची काळजी घेण्याबरोबरच आपले कुटुंबं, शहर आणि समाजाची काळजी घेणे कर्तव्य आहे. कार्डिनल ग्रेशर्स हॉस्पिटल 3 व्हेंटिलेटर आणि 5 बायटॅब ची वाढ करून, कोरोना रुग्णांसाठी 150 बेडची व्यवस्था करीत आहे. त्याशिवाय माझ्या सूचनेनुसार बसीन कॅथॉलिक सहकारी बँक आणि कार्डिनल ग्रेशर्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने देवतालाव येथील फादर बर्नड भंडारी सभागृहात लवकरच कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कोविड सेंटर सुरु करण्यात येत आहे.

हेही वाचा: धक्कादायक सत्य! दुसऱ्या लाटेत तज्ज्ञांचा इशारा; अचानक होतेय ऑक्सिजन पातळी कमी

आगाशी येथील संत तेरेजा हॉस्पिटल मधील सिस्टर भगिनींना तेथे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सोय करण्यास सांगण्यात आले असून, तेथील गंभीर रुग्ण कार्डिनल ग्रेशर्स हॉस्पिटलमध्ये हलविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व उभारण्यासाठी निधी सोबतच डॉक्टर, नर्स आणि अन्य स्टाफची आणखी आवश्यकता आहे. समाजातील निवृत्त अथवा नवे प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सेस यांनी या रुग्ण सेवेसाठी पुढे यावे, अश्या इच्छुकांनी कार्डिनलच्या अधिकारी फ्लॉरी डिमेंटो यांच्याशी संपर्क साधावा. समाजातील दानशूर व्यक्ती आणि सहकारी संस्थांनी या कामासाठी लागणाऱ्या खर्चात आपले योगदान द्यावे, सर्वांनी लसीकरण करून घयावे आणि संशय येताच टेस्टही करावी, असे आवाहन सुद्धा डॉ. मच्याडो यांनी केले आहे.

हेही वाचा: वसईत ख्रिश्चन धर्मीयांकडून केलं जातंय प्रेताचं दहन

खरा ऑक्सिजन आणि औषध हे देवाची भक्ती आहे. त्याच्या कृपेसाठी शुक्रवारी भारतात ख्रिस्ती समुदायातर्फे देशव्यापी उपवास आणि प्रार्थना करण्यात येणार असून वसई विरार धर्मग्रामातील सर्व ख्रिस्ती समाजाने त्यात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन या संदेशात डॉ मच्याडो यांनी केले आहे.

(संपादन- विराज भागवत)

loading image