गेली चाळीस वर्षे CIDCO ची उदासीनता; ९५ गावांतील प्रकल्पग्रस्तांचे काळा दिन आंदोलन

strike
strike Sakal media

पनवेल : सिडको (cidco) गेली चाळीस वर्षे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर उदासीनता दाखवत आहे. पूर्णतः भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या (Project victims demand) अजूनही पूर्ण केल्या नाहीत. याचा निषेध म्हणून आज (गुरुवारी, ता. १७) म्हणजेच सिडकोच्या वर्धापनदिनी पनवेल, उरण व बेलापूर पट्ट्यातील ९५ गावांतील प्रकल्पग्रस्त काळा दिन (Black day strike) पाळणार आहेत. तसेच, प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील (Di Ba Patil) यांचे जन्मगाव जासई येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airport) नामकरण कृती समितीच्या वतीने देण्यात आली.

strike
कर्नाटकातील परिस्थिती मुंबईत; मुस्लिम महिलेला लोकलमध्ये बसण्यास नकार

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना निवेदन दिल्यानंतर सिडकोच्या वतीने मुंबईतील निर्मल भवन येथे कृती समितीबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत सिडकोने केलेला ठराव विखंडित करून लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा ठराव मंजूर करावा, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना विनाविलंब साडेबारा टक्केचे भूखंड वाटप, गरजेपोटी बांधकामाबाबत झालेल्या शासनाच्या निर्णयातील त्रुटी आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या याविषयी चर्चा झाली.

मात्र, सिडकोने विमानतळ नामकरणाचा ठराव देण्यास नकार देत बाकी सर्व मागण्यांवर बैठका करू, लवकर सर्व प्रश्न सोडवू, अशी उत्तरे दिली. सिडको व्यवस्थापनाने कुठलेही ठोस आश्वासन न दिल्याने ही चर्चा फिस्कटली. यामुळे कृती समिती कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांच्यासह कृती समितीचे सरचिटणीस भूषण पाटील, नवी मुंबई महानगरपालिका पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत, खजिनदार जे. डी. तांडेल, अतुल पाटील, नंदराज मुंगाजी, रुपेश धुमाळ, राजेश गायकर, सुरेश पाटील, विनोद मात्रे, दीपक पाटील आदींनी आज निषेध दिन पाळण्याचा निर्धार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com