

NMIA Runway Intrusion
ESakal
नवी मुंबई : गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असणाऱ्या नवी मुंबई विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून लवकरच या विमानतळावरून पहिले उड्डाण होणार आहे. येत्या २५ डिसेंबरपासून म्हणजेच पुढील १२ दिवसांत नवी मुंबई विमानतळावरील विमानसेवा सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. मात्र असे असले तरीही विमानतळावर सुरक्षा भंगाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे.