कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल एथिकल कमिटीच्या मान्यतेअभावी रखडली

भाग्यश्री भुवड 
Thursday, 19 November 2020

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (ICMR) कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील संपुर्ण भारतातून चाचणीसाठी या  रुग्णालयाची निवड करण्यात आली.

मुंबई , 19 : भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिन लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी सायन रुग्णालयाला एथिकल कमिटीच्या मान्यतेची प्रतिक्षा आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयाच्या नीतिशास्त्र समितीला ट्रायलच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. परंतु अद्याप समितीकडून हिरवा कंदील मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे.

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (ICMR) कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील संपुर्ण भारतातून चाचणीसाठी या  रुग्णालयाची निवड करण्यात आली.

महत्त्वाची बातमी भातखळकरांकडे मुंबईची जबाबदारी देऊन भाजपने आशिष शेलारांचे पंख छाटले ?

सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की,  नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयाच्या इथिकल समितीला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र अद्याप समितीकडून हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, आमच्याकडे इच्छुक अशा 100 हून लोकांनी चौकशी केली. त्यामुळे, समितीच्या अंतिम मंजुरीची आम्ही वाट पाहत आहोत. त्यानंतर, चाचणीवर लक्ष केंद्रीत केले जाईल. दरम्यान, या रूग्णालयात 1,000 स्वयंसेवकांवर चाचणी घेतली जाणार आहे.

हैदराबादस्थित भारत बायोटेकद्वारे विकसित करण्यात आलेल्या लसीची तपासणी करण्यासाठी लवकरच संभाव्य उमेदवारांसाठी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या जातील. नंतर ICMR च्या नियमांनुसार स्वयंसेवकांचा 12 महिने पाठपुरावा केला जाईल. 

'सध्या समितीच्या मान्यतेकडे लक्ष केंद्रित असून येत्या दोन ते तीन दिवसात मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे ' असं सायं रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी म्हणालेत.

महत्त्वाची बातमी "चायनीज हॉटेल्सचा चीनशी काय संबंध ? बेवकूफ शिवसैनिकांना हे कधी कळणार?", संजय निरुपम यांनी उडवली सेनेची खिल्ली

दरम्यान, रुग्णालयाने 022-24073700 / 3703 एक समर्पित हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे. जेथे लोक चाचणीच्या संदर्भात चौकशीसाठी कॉल करु शकतात. उत्सवामुळे मंजुरीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे, परंतु आमचा विश्वास आहे की येत्या  2 ते 3 दिवसांत समितीकडून मान्यता मिळवली जाईल, "असे रुग्णालयातील फुफ्फुसाचे औषध प्रमुख डॉ. एन टी आव्हाड यांनी सांगितले. 

शिवाय, कोव्हॅक्सिनच्या चाचणीसाठी रूग्णालय बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) समर्पित करण्याचा विचार करत आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीचा सीरम साठवण्यासाठी रुग्णालय विशेष रेफ्रिजरेटर खरेदी करत आहे.

महत्त्वाची बातमी तुम्ही जिथे मोठ्या उत्साहाने जातात असे तब्बल 29 मॉल्स धोकादायक, संपूर्ण यादी वाचा आणि जायचं की नाही ते ठरवा

तिसर्‍या टप्प्यात दोन टप्पे असतील. पहिल्या लसीकरणाच्या 28 दिवसानंतर स्वयंसेवकांना दुसरा डोस  दिला जाईल," असे ही डॉ. जोशी यांनी सांगितले.

The clinical trial of the covaccin vaccine was delayed due to lack of approval from the Ethical Committee


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The clinical trial of the covaccin vaccine was delayed due to lack of approval from the Ethical Committee