Dilip Vengsarkar: क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरांना मुंबई महापालिकेची नोटीस

दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लबचे सचिव परवेझ बाना यांनी कमी जागेमध्ये नवीन खेळपट्टी तयार केल्याचा आरोप
Dilip Vengsarkar
Dilip VengsarkarEsakal

कथित जमीन अतिक्रमणाच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेने 15 डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या दादर युनियन स्पोर्टिंग क्लबला (DUSC) नोटीस बजावली आहे. तर कोणत्याही जमिनीवर अतिक्रमण केलेले नाही आणि क्लब नियमांनुसार चालत आहे. असा दावा वेंगसरकर यांनी केला आहे.

डीयूएससीच्या शेजारी असलेल्या शंभर वर्षे जुन्या दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लबच्या (डीपीसीएससी) सदस्यांनी ही तक्रार दाखल केली होती. हा क्लब दादर (पूर्व) येथील पारशी कॉलनी परिसरात आहेत.

DPCSC ची स्थापना 1923 मध्ये रिकाम्या जमिनीवर भाडेकरार धोरणांतर्गत उभारणी केली होती, ज्यानुसार, मुंबई महापालिकेने लोकांच्या मनोरंजनासाठी किंवा लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने ही जागा भाड्याने दिली होती.

Dilip Vengsarkar
Umran Malik | मी असतो तर उमरान मलिकला घेतलं असतं : माजी निवडसमिती अध्यक्ष

दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लबचे सचिव परवेझ बाना यांनी कमी जागेमध्ये नवीन खेळपट्टी तयार केल्याचा आरोप केला आहे. एफ नॉर्थ वॉर्डचे सहाय्यक महापालिका आयुक्त गजानन बेल्लाले यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे.

“दोन खेळपट्ट्या फारच वेगळ्या आहेत आणि हे खेळाडूंसाठी धोकादायक आहे. ज्यामध्ये मृत्यू देखील होऊ शकतो,” असं बाना यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे. खेळपट्ट्या योग्य अंतरावर असतील यासाठी काही नियम तयार करावेत अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

२९ एप्रिलला हे पत्र वॉर्ड ऑफिसला पाठवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात नोव्हेंबरपर्यंत बीएमसीने कोणतीही कारवाई केली नसल्याचेही बाना यांनी म्हणाले आहे. ज्या जमिनीवर नवीन खेळपट्टी तयार करण्यात आली आहे ती जागा डीयूपीसीचा नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Dilip Vengsarkar
Arjun Tendulkar: ठरलं तर मग! रणजी ट्रॉफीत कहर केल्यानंतर अर्जुन IPL 2023 मध्ये खेळणार ?

बाणा म्हणाले की, “वॉर्ड ऑफिस कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे, आम्ही गेल्या महिन्यात महापालिका आयुक्तांपर्यंत हे प्रकरण पोहोचेपर्यंत विविध माध्यमांद्वारे हे प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर स्थानिक वॉर्ड ऑफिसला तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com