Train Accident Mumbai: दुर्दैवी आणि क्लेशदायक! मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, म्हणाले रेल्वे दुर्घटना म्हणजे...

Mumbai Local Accident: आज सकाळी मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान लोकलचा भीषण अपघात घडला. या घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून राज्यभरातून एकच हळहळ व्यक्त होत आहे. अशातच मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी रेल्वे दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
Train Accident Mumbai
Train Accident MumbaiESakal
Updated on

मुंबई : आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान लोकलचा भीषण अपघात घडला. सीएसएमटी आणि कल्याण-कसारा दिशेने जाणाऱ्या लोकल प्रवाशांना एकमेकांचा धक्का लागून ८ ते ९ प्रवासी खाली पडले. हे सर्व प्रवासी रेल्वेच्या दरवाजाजवळ उभे असल्यामुळे दिवा-मुंब्रामधील एका वळणावर जोरदार धक्का लागला. या घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून घटनेमुळे राज्यभरातून एकच हळहळ व्यक्त होत असताना मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी दिवा-मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com