

CM Devendra Fadnavis On NMAIA Project
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रातील नियोजित शहर उभारण्यासाठी नैना प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांच्या हरकती, अंतिम भूखंडांचे वाटप, रस्त्यांच्या आराखड्यांबाबतचे प्रश्न आणि कंत्राट प्रक्रियेतील अडचणी अशा कारणांमुळे नैना प्रकल्पाची अंमलबजावणी रखडली होती. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन केले आहे. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेल्या 'नैना' प्रकल्पाला गती मिळणार आहे.