Farmer Scheme
ESakal
Farmer Scheme: 'त्या' शेतकऱ्यांना २०२६ पर्यंत मिळणार १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुंबई : सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत (एमएसकेव्हीवाय) २०२६पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मोफत मिळणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अवादा ग्रुप या वैविध्यपूर्ण ऊर्जा समूहाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात ११ सौरऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज मिळावी, यासाठी आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे.
यात यवतमाळ जिल्ह्यात ३५ मेगावॉटचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना दिवसा निःशुल्क वीज मिळणार आहे. तसेच, सन २०२६ पर्यंत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबत अवादा ग्रुपचे अध्यक्ष विनीत मित्तल म्हणाले, की ‘स्वच्छ ऊर्जा थेट ग्रामीण समुदायांचा विकास कशा प्रकारे करू शकते, याचे एक मॉडेल मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० हे आहे. या माध्यमातून १६७ गावांमधील १४,८९३ शेतकऱ्यांना फायदा होईल.’
काय आहे योजना?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज मिळावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. कृषी ग्राहकांना दिवसा आणि रात्री आवर्तन तत्त्वावर वीज पुरवठा केला जातो. मात्र रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दिवसा शेतकर्यांना विश्वासार्ह वीज पुरवठा करण्याची मागणी केली जात होती. या समस्यांवर मात करण्यासाठी, "मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना" नावाची योजना सुरु करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.