
मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येनं मराठा बांधव य़ा आंदोलनासाठी राज्यभरातून मुंबईत दाखल झाले आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय परतणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना मोठे आरोप केले आहेत. मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय.