

CM Devendra Fadnavis
sakal
मुंबई : आजच्या रोजगार बाजारपेठेत केवळ शैक्षणिक पदवीला फारसे महत्त्व राहिलेले नाही. त्या पदवीला व्यावहारिक कौशल्ये आणि उपयोजित ज्ञानाची जोड असेल, तरच तिचे महत्त्व आहे; अन्यथा पदवी हा केवळ कागदाचा तुकडा ठरतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.