मुख्यमंत्री आज रात्री ८.३० वाजता काय घोषणा करणार?

जनतेचे अनलॉककडे डोळे
cm uddhav thackeray
cm uddhav thackeray file photo

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आज रात्री ८.३० वाजता सोशल मीडियावरुन जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष असेल. कारण मागच्या ५० दिवसांपासून लॉकडाउनमध्ये (lockdown) असलेल्या जनतेचे लक्ष अनलॉकच्या निर्णयाकडे लागले आहे. मुख्यमंत्री आज काय बोलतात ते महत्त्वाचे आहे. (Cm of maharashtra uddhav thackeray today will address people of state)

लॉकडाउनमुळे राज्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. मुंबईत तर डबलिंग रेट ३५० दिवसांच्या पुढे गेला आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री निर्बंधांमधून किती सवलत देणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. लॉकडाउनमुळे कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असली, तरी लोकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. हातावर पोट असणारी जनता, व्यापारी वर्ग अक्षरक्ष: मेटाकुटीला आला आहे.

cm uddhav thackeray
मुंबईच्या 'द ललित' हॉटेलमध्ये लसीकरण, संतप्त महापौरांची धडक

मुख्यमंत्र्यांना अनेकांनी पत्र लिहून लॉकडाउन उठवण्याची मागणी केली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी सरसकट लॉकडाउन उठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण अनलॉकमध्ये दुकाने उघडण्यासह, प्रवास, जिल्हाबंदी रद्द करण्याचा निर्णय होणार ? हे पाहणे महत्त्वाचे आहे. मुंबईकरांसाठी लोकलचा विषय महत्त्वाचा आहे. कारण लोकल बंद असल्यामुळे प्रवासावर मर्यादा आल्या आहेत.

cm uddhav thackeray
दुसऱ्या लॉकडाउनमुळे उल्हासनगरचं ५०० कोटींचं नुकसान

सध्या अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु होण्याची शक्यता धुसर दिसतेय. पण काही घटकांना लोकल प्रवासाची मुभा दिली जाऊ शकते. याआधी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर अनेकांनी मुंबई लोकलला जबाबदार धरले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com