मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा जनतेला केली कळकळीची विनंती

पूजा विचारे
Thursday, 24 September 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कोरोनाचं संकट पाहता आता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दुर्गापूजा, दसरा साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

मुंबईः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कोरोनाचं संकट पाहता आता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दुर्गापूजा, दसरा साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. गणपती उत्सवादरम्यान जसं सहकार्य केलं त्याचप्रकारे नवरात्र, दसरा सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावे, जेणेकरुन कोरोनाचा प्रसार थांबवता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती अद्याप कायम आहे. स्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं. येत्या १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दुर्गापूजा, विजयादशमी (दसरा) हे सण साजरे होणारेत. सध्याच्या कोरोनाची स्थिती पाहता येणारे सण हे साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शासनानं परिपत्रक काढलं होतं. त्याचप्रमाणे या सणाबाबत देखील लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येणारेय. 

अधिक वाचाः  भिवंडी दुर्घटना:  55 तास उलटूनही बचावकार्य सुरु, मृतांचा आकडा 41 वर

कोरोना संदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचाः  पावसावर खापर फोडू नका?, आशिष शेलारांकडून शिवसेनेवर प्रश्नांचा भडिमार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशातल्या 7 राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना स्थितीवर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना महाराष्ट्र राज्यातील स्थिती सांगितली. 

CM Uddhav Thackeray Appeal celebrate navaratri simple way 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Uddhav Thackeray Appeal celebrate navaratri simple way