मोठी बातमी - आता उद्धव ठाकरेंच्या आमदारकीत काँग्रेसनं घातला अडसर?

मोठी बातमी - आता उद्धव ठाकरेंच्या आमदारकीत काँग्रेसनं घातला अडसर?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीची  चर्चा सुरु आहे. येत्या २१ मे रोजी विधान परिषदेची निवडणूक आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या बिनविरोध निवडून येण्याला आता महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनं अप्रत्यक्ष विरोध दर्शवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवर निवडून येण्याबद्दल राजकारण चांगलंच तापलं होतं. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून राज्यपालांकडे सतत उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून देण्याची मागणी करण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर २१ मे रोजी विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.

मात्र महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनं यात अडसर घातला आहे. विधान परिषदेसाठी एकूण ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात शिवसेना-२, राष्ट्रवादी काँग्रेस - २, काँग्रेस - १ आणि भाजप- ४ असे उमेदवार असते तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यात अडसर घालत काँग्रेस २ जागा लढणार असं जाहीर केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बिनविरोध निवडून येऊ शकणार नाहीत हे स्पष्ट झालंय.  

याबद्दल बोलताना "महाविकास आघाडी ६ उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. ६ उमेदवार निवडून आणण्याची महाविकास आघाडीची क्षमता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार आहेत, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे.

निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मंगळवारी रात्री बैठक झाली. मात्र याबाबत कोणताही तोडगा निघाला नाही.

कोणाच्या नावांची आहे चर्चा:

राष्ट्रवादी पक्षाकडून विधानपरिषद निवडणूक उमेदवारीसाठी हेमंत टकले, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर या इच्छुकांची नाव चर्चेत आहेत. तर काँग्रेस पक्षाकडून मोहन जोशी, माणिकराव ठाकरे, नसिम खान, मुजप्फर हुसेन यांची नाव चर्चेत आहेत. शिवसेनेकडून उद्धव  ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं विधान परिषदेसाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे हे दोघेही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

CM uddhav thackeray will have to face MLC election because congress did this

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com