esakal | धक्कादायक! : आता आर्थर रोड कारागृहातही कोरोनाचा प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

Arthur-Road-jail

कारागृहात सोशल डिस्टन्सिंग तसेच आरोग्याच्या बाबतची खबरदारी घेतली जात होती. मात्र तरीही मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील एका 50 वर्षीय कैद्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. https://www.esakal.com/mumbai/st-will-provide-free-service-citizens-who-want-go-village-289691

धक्कादायक! : आता आर्थर रोड कारागृहातही कोरोनाचा प्रवेश

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : देशात कोरोना प्रादर्भाव वाढु लागला असताना राज्यातील विविध तुरुंगातील कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून सरकारकडून अनेक कैद्यांना सोडण्यात आले. कारागृहात सोशल डिस्टन्सिंग तसेच आरोग्याच्या बाबतची खबरदारी घेतली जात होती. मात्र तरीही मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील एका 50 वर्षीय कैद्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 800 कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात 2700 कैदी आहेत.

मोठी बातमी ः चिंताजनक ! ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंंख्या 100 पार

आर्थर रोड कारागृहातील 50 वर्षीय कैद्याला कोरोनाची लागण झाली असून एका खून प्रकरणात नोव्हेंबर महिन्यात या कैद्याला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. राज्यातील लॉकडाऊन करण्यात आलेल्या काही कारागृहांपैकी आर्थर रोड तुरुंग असून दोन दिवसांपूर्वी त्याला अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्याला जे.जे. रुग्णालयात उपायारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्याला कोरोनाची लागणं झाल्याचे स्पष्ट झाले.  त्याला आता वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवले आहे. हा रुग्ण सापडलेला यार्ड कन्टेंन्मेंट करण्यात आला आहे. तसेच या कैद्याला रुग्णालयात घेऊन गेलेल्या सुरक्षारक्षकाला क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातील कैद्यांच्या वैद्यकीय चाचणीला सुरूवात करण्यता आली असून 150 कैद्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे.

मोठी बातमी ः गावी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एसटीची 'ही' खास योजना, वाचा

अनेक कारागृहात कैद्यांची प्राथमिक वैद्यकीय चाचणी करुन त्यांना सोडण्यात येत आहे. तर काही कारागृहात टेम्परेचर गनच्या सहाय्याने कैद्यांची चाचणी करुन त्यांना सोडण्यांस सुरुवात केलीआहे. तर काही कैद्यांची प्राथमिक वैद्यकीय अहवाल बाकी असुन, त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यांना देखील दोन टप्यात सोडण्यात येणार असल्याचे कारागृह प्रशासनाने सागंतिले. तसेच राज्यातील विविध मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहात कैदेत असलेल्या कच्च्या कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया देखील कारागृह प्रशासनाने सुरू केली आहे. सर्वाच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतर सरसकट कैद्याना बाहेर न सोडता त्यांच्याकडून जामीनपत्र लिहुन घेतले जात आहे. त्यानुसार, त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. वैद्यकीय अहवाल व्यवस्थित असेल अशाच कैद्याना जामीनावर बाहेर सोडले जात आहे. त्यानुसार, लॉकडाऊनच्या कालावधीत 5 हजार 105 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. 

मोठी बातमी ः कर्मचारी हवालदिल, पालिका प्रशासन अडचणीत; कोरोना संकटांत कसा सोडवणार हा तिढा

त्यानुसार मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून 582 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ तळोजा कारागृातून 498, ठाणे कारागृहातून 443 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे . असेच पुढेही टप्याटप्याने 11 हजार कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. जामिनावर सोडलेल्या कैद्यामध्ये सात वर्षापेक्षा अधिक तसेच सात वर्षापेक्षा कमी शिक्षा झालेल्या कैदी त्याचप्रमाणे, दोन वेळा पॅरोलवर जाऊन नियमानुसार आतमध्ये आलेल्या कैद्यांना सोडण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सात कारागृहांमध्ये पूर्ण पणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

loading image
go to top