
त्याद्वारे देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार केले जाईल, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज येथे व्यक्त केला.
मुंबईः उद्योगस्नेही उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणुक, उद्योग, नोकऱ्या आणि मनोरंजन या बाबी आणून राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेली जाईलच. पण त्याद्वारे देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार केले जाईल, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज येथे व्यक्त केला.
उत्तर प्रदेशात उद्योगधंदे आणि गुंतवणुक यावी यासाठी मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या आदित्यनाथ यांनी आज दिवसभर संरक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रातील उद्योजकांशी तसेच चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या भेटी घेऊन चर्चा केली. यात टाटा सन्स, भारत फोर्ज, लार्सन टुब्रो, महिंद्र, सिमेन्स हे उद्योगसमूह तसेच फिक्की ही उद्योजक संघटना आदींचा समावेश होता. त्यानंतर संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मत व्यक्त केले.
आदित्यनाथ हे बॉलिवूड किंवा येथील उद्योगधंदे खेचून नेण्यासाठी येत आहेत अशी टीका त्यांच्यावर शिवसेना तसेच मनसे च्या नेत्यांनी केली होती. मात्र आपण येथे अत्यंत शुद्ध हेतूने केवळ जनतेला लाभ मिळावेत यासाठी आलो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा- मध्य रेल्वे मार्गावर मुलांसह महिलांचा प्रवास, रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचे तीनतेरा
गेल्या तीन वर्षांत उत्तर प्रदेशात सुमारे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणुक झाली आहे. उत्तर प्रदेशातील नागरी विभागात सातशे स्थानिक स्वराज्य संस्था असून येथे आठ कोटी लोक राहतात. त्यामुळे येथे उद्योगांच्या वाढीला मोठा वाव आहे. कारभारातील पारदर्शकता तसेच कायदा व सुव्यवस्थेची उत्तम परिस्थिती यामुळे उद्योजक उत्तर प्रदेशात येण्यास उत्सुक आहेत. येथील डिफेन्स (उत्पादन) कॉरिडॉर साठी आग्रा, झाशी, चित्रकूट, अलीगढ, लखनौ, कानपूर आदी सहा विभाग तयार असून आयआयटी कानपूरकडून यासाठी तांत्रिक पाठबळही मिळेल.
मुंबई विभागातल्या अन्य बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
देशात सर्वात चांगली सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग उत्तर प्रदेशात असून कोरोना काळातही अशा दहा लाख उद्योगांना बँकांशी जोडण्यात आले आहे. राज्यात कोरोनाच्या साथीवरही नियंत्रण ठेवण्यात आले असून इज ऑफ डुईंग बिझनेस मध्येही राज्याला देशात दुसरा क्रमांक मिळाला आहे. लवकरच राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेऊन देशाची अर्थव्यवस्थाही पाच लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्यास हातभार लावला जाईल, अशी खात्रीही आदित्यनाथ यांनी व्यक्त केली.
------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Up cm yogi Adityanath believes Uttar Pradesh economy will reach one trillion