Coaching Classes Regulation : शनिवारी, कोचिंग क्लासेस महासंघाकडून होणार शिक्षकांचा सन्मान प्रस्तावित नियमांबाबत महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनच्या व्यावहारिक अडचणी

Teachers to Be Honoured at MCOA Programme in Mumbai ; महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनतर्फे ३ ऑक्टोबरला मुंबईतील दादर येथे शिक्षकांचा सन्मान आणि ‘संकल्प’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Coaching Classes Regulation

Coaching Classes Regulation

esakal

Updated on: 

मुंबई : महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनच्या (एमसीओए) केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत दादर येथील किंग जॉर्ज सभागृहात शिक्षकांचा सन्मान आणि ‘संकल्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गेल्या ३० ते ४० वर्षांत लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याबरोबरच राज्यातील कोचिंग क्लासेससमोरील विविध नियामक अडचणींबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

या कार्यक्रमास राज्यभरातील १,००० हून अधिक कोचिंग क्लासेसचे संचालक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कोचिंग क्षेत्रातील योगदान देणारे शिक्षक तसेच अनेक वर्षे प्रसिद्धीपासून दूर राहून कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याची आणि विद्यार्थ्यांवरील प्रभावाची माहिती व्यापक समाजापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

दरम्यान, प्रस्तावित कठोर नियमनातील काही तरतुदींविषयी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी आक्षेप नोंदवले आहेत. संघटनेच्या म्हणण्यानुसार, १३ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग देण्यास निर्बंध, दिवसातील अध्यापनाच्या वेळेवर पाच तासांची मर्यादा, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक चौरस मीटर जागेची अट, पार्किंगची सुविधा, व्यावसायिक इमारत व अग्निसुरक्षा नियमांचे पालन, साप्ताहिक सुट्टी, तपासणी व क्लास बंद अथवा सील करण्याचे अधिकार, मोठ्या दंडाची तरतूद आणि दहा वर्षांच्या नोंदी जतन करण्याची अट यामुळे लहान व मध्यम कोचिंग क्लासेससमोर व्यावहारिक अडचणी निर्माण होऊ शकतात.

संघटनेने विशेषतः मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देणे आणि स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करणे कठीण असल्याचे म्हटले आहे. अनेक विद्यार्थी रेल्वे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असल्याने प्रत्येक कोचिंग संस्थेला स्वतंत्र पार्किंगची अट व्यावहारिक ठरणार नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.

अग्निसुरक्षेबाबतचे नियम आवश्यक असल्याचे मान्य करताना, कोचिंग क्लासेसप्रमाणेच इतर शैक्षणिक संस्था आणि व्यवसायांसाठीही स्पष्ट व समान सुरक्षा निकष असावेत, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी, अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि पुनरावृत्ती यासाठी काही प्रसंगी निर्धारित वेळेपेक्षा अधिक अध्यापनाची गरज भासू शकते. त्यामुळे अध्यापनाच्या वेळेबाबत लवचिकता ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

तपासणी, शोध, पूर्वसूचनेशिवाय प्रवेश तसेच क्लास बंद किंवा सील करण्याच्या अधिकारांमुळे गैरवापर, त्रास अथवा भ्रष्टाचाराची शक्यता निर्माण होण्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे. तसेच मोठ्या आर्थिक दंडामुळे लहान आणि मध्यम क्लासेसवर आर्थिक भार पडू शकतो, असेही संघटनेचे म्हणणे आहे. दहा वर्षांच्या विस्तृत नोंदी जतन करण्याची अटही छोट्या संस्थांसाठी प्रशासकीयदृष्ट्या आव्हानात्मक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

आम्ही नियमनाच्या विरोधात नाही; मात्र नियमन करताना कोचिंग क्षेत्रातील व्यावहारिक अडचणींचाही विचार करण्यात यावा, अशी भूमिका महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे. सरकारने कोचिंग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि प्रस्तावित कठोर अटींबाबत व्यावहारिक मार्ग काढावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होते, कर व जीएसटी भरण्यात येतो तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त शैक्षणिक मदत मिळते, असे संघटनेने नमूद केले आहे. काही संस्थांतील अनियमिततेमुळे संपूर्ण कोचिंग क्षेत्रावर कठोर निर्बंध लादण्याऐवजी नियमांची अंमलबजावणी करताना संस्थांच्या आकारमानानुसार आणि प्रत्यक्ष परिस्थितीनुसार व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा, अशी संघटनेची मागणी आहे.

या पार्श्वभूमीवर शिक्षकांचा सन्मान, कोचिंग क्षेत्राची एकजूट आणि प्रस्तावित नियमनाबाबत संघटनेची भूमिका मांडण्यासाठी ‘सम्मान व संकल्प’ कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com