

Dharavi-Bhandup Water Tunnel Project
ESakal
मुंबई : मुंबईसाठी एक महत्त्वाचा पायाभूत सुविधांचा टप्पा गाठण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजित बोगद्याला कोस्टल रेग्युलेटरी झोनची मान्यता मिळाली आहे. या बोगद्याद्वारे धारावी प्रक्रिया सुविधेतून तृतीयक प्रक्रिया केलेले सांडपाणी घाटकोपरमार्गे भांडुप वॉटर फिल्ट्रेशन प्लांटमध्ये वाहून नेले जाईल. धारावी सांडपाणी प्रक्रिया सुविधा (WWTF) मधून भांडुप वॉटर फिल्ट्रेशन प्लांटमध्ये तृतीयक प्रक्रिया केलेले पाणी घाटकोपर WWTF मार्गे वाहून नेण्यासाठी ८.४८ किमी, २.७ मीटर व्यासाच्या बोगद्यासाठी बीएमसीला कोस्टल रेग्युलेटरी झोन (CRZ) कडून मंजुरी मिळाली आहे.