

Abhijeet Dipke’s Allegations About Mumbai Police Action
esakal
'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांना गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील मरीन ड्राइव्हवरून पोलीस ठाण्यात नेल्याची घटना समोर आली आहे. दिपके यांचा आरोप आहे की, एका महिला पोलीस अधिकाऱ्याने त्यांना चहासाठी सोबत येण्यास सांगितले, परंतु त्यानंतर त्यांना पोलीस वाहनातून थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, मुंबई पोलिसांनी दिपके यांना ताब्यात घेतल्याचा स्पष्टपणे इन्कार केला आहे.