

Colaba Bike Accident
esakal
मुंबई : कुलाबा येथील अफगाण चर्चजवळ आणि पोस्ट ऑफिसच्या शेजारी आज (ता.२३) पहाटेच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात झाला. एका दुचाकीचा रस्त्यावरील दुभाजकाला (डिव्हायडर) जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोन अज्ञात व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑनड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांनी आज सकाळी ६:०० वाजता या अपघाताची माहिती दिली. दुचाकीवरून जाणाऱ्या दोन व्यक्तींचे नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी रस्ता दुभाजकाला जाऊन धडकली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते.
घटनेची माहिती मिळताच जखमींना तातडीने उपचारासाठी जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक यांनी तपासणीनंतर दोन्ही अज्ञात व्यक्तींना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
अपघातातील मृतांची नावे आणि वयाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसून पोलीस ओळख पटवण्याचे काम करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र अरे गणेशोत्सवात दोनच दिवसांपूर्वी पोस्टल रोड पुलावरून बीएमडब्ल्यू कार ७० फूट खोल खाली कोसळून तिघांचा मृत्यू झाल्यानंतर आज बाईक दिवाळीला धडकून झालेल्या अपघात दोघांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.