Mumbai Cold : मुंबईत गुलाबी थंडीचे आगमन

मुंबईतील किमान तापमान घसरल्याने गेल्या तीन दिवसंपासून गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे.
Mumbai Cold
Mumbai Coldsakal

मुंबई - मुंबईतील किमान तापमान घसरल्याने गेल्या तीन दिवसंपासून गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे. आज ही किमान तापमान १७ अंशांवर असल्याने हवेत गारवा कायम होता. पुढील दोन दिवस तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सांताक्रूझ येथे १७.२ तर कुलाबा येथे २० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले आहे. शहराच्या तुलनेत उपगरात अधिक गारवा आहे. मंगळवारी पश्चिम विभागात यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. किमान तापमान १६ अंशांपर्यंत खाली घसरले होते.

राज्यासह देशात अनेक भागात थंडीचे आगमन झाले आहे. त्याचा परिणाम मुंबईत ही जाणवू लागला आहे. बोचऱ्या थंडीमुळे चहाच्या टपऱ्यांवर गर्दी वाढली आहे. तर अनेकजण गरमागरम भजीवर ताव मारत आहेत. सीएसएमती, लालबाग, परळ भागातील गरम कपडे खरेदीसाठी देखील ग्राहकांची गर्दी होत असल्याचे दिसते आहे. मुंबईत उशिरा थंडीचे आगमन झाल्याने मुंबईकर त्याचा आनंद घेताना दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com