esakal | नवे आयुक्त ऍक्शनमध्ये ! कोरोनाला थोपवण्यासाठी 'मायक्रो प्लॅनिंग', प्रशासनाला महत्वाचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

 bmc

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करण्याबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग दुप्पट वाढविण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेेेत.

नवे आयुक्त ऍक्शनमध्ये ! कोरोनाला थोपवण्यासाठी 'मायक्रो प्लॅनिंग', प्रशासनाला महत्वाचे आदेश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करण्याबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग दुप्पट वाढविण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेेेत. आयुक्तांनी शनिवारी अतिरिक्त आयुक्तापासून सर्व विभागप्रमुख, सहाय्यक आयुक्तांनी बैठक घेतली. यात आतापर्यंत सुरु असलेल्या कामाचा आढावा घेऊन आयुक्त चहल यांनी प्रशासनाला कॉन्टक्ट ट्रेसिंग वाढविण्याचे आदेश दिले. त्याच बरोबर 100 कोव्हिड केंद्रांवर 200 रुग्णवाहिका तैनात ठेवण्याचे आदेश ही दिले आहेत. 

मोठी बातमी धक्कादायक ! कोरोनामुळे सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू

सध्या एका बाधित रुग्णामागे 3 कॉन्टॅक्ट ट्रेस केले जातात.त्या ऐवजी आता 6 कॉन्टॅक्ट ट्रेस केले जाणार आहेत.यात अतिधोकादायक व्यक्तींना शोधून त्यांना तात्काळ क्वारंटाईन करावे. तसेच झोपडपट्ट्यांमधील अतिधोकादायक संपर्कांना तत्काळ केंद्रामध्ये स्थलांतरीत करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. रुग्णवाहिकांची समस्या गंभीर झाली आहे. त्याचीही दखल घेत आयुक्तांनी घेतली असून 100 कोव्हिड केंद्रांवर 200 रुग्णवाहिका तैनात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मोठी बातमी अडकलेल्या नागरिकांनो! घरी जाण्यासाठी ST महामंडळाशी असा साधा संपर्क

प्रतिबंधित क्षेत्रात रिझल्ट हवा 

कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर महापालिका तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करते. मात्र,धारावीच्या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांचा मुक्त संचार असल्याचे केंद्रीय पथकाला आढळून आले होते. त्याच बरोबर आयुक्तांनी काल या भागाला भेट दिल्यानंतर त्यांनाही असाच प्रकार आढळला. त्यावर प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी व्यवस्थापन हवे. तेथील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करावी. पोलिसांशी वेळोवेळी समन्वय ठेवून काम करण्या बरोबरच समन्वयक म्हणून कोव्हिड योद्यांची नियुक्ती करावी. या सर्वातून फलनिष्पिती होईल याकडे लक्ष द्यावे असेही आयुक्तांनी नमुद केले. या भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा होतोय याचीही खबरदारी घ्यावी. 

नक्की वाचा : लॉकडाऊनमुळे नोकरी मिळत नाहीये?..घाबरू नका.. अशी मिळवा नोकरी

विभागस्तरीय कार्यवाहीच्या अनुषंगाने मुंबई

पोलीस, एस आर पी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इत्यादी शासकीय व निमशासकीय संस्थांच्या स्तरावर नियमितपणे संपर्क व समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

बेड मॅनेजमेट सहाय्यक आयुक्तांची जबाबदारी 

सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त हे त्यांच्या विभागाचे 'आयुक्त' आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागात घडणाऱ्या विविध बाबींवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवणे व आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी करणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने त्यांच्या कार्यक्षेत्रात पालिकेची जी रुग्णालये येतात, त्या रुग्णालयांमधील कार्यवाहीवर लक्ष ठेवणे व तेथील व्यवस्था अधिकाधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देऊन अपेक्षित कार्यवाही करवून घेणे; ही बाब देखील सहाय्यक आयुक्तांनी करवून घ्यावयाची आहे. त्याचबरोबर पालिकेच्या सर्व रुग्णालयांची 'बेड' क्षमता वाढविण्यासह 'बेड' व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देशही  दिले पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या स्तरावर कार्यवाही करावयाची आहे. त्यामुळे एखाद्या विभागातील रूग्णालयात जागा नसल्यास, ज्या विभागात व्यवस्था होऊ शकते, अशा अन्य विभाग क्षेत्रातील रुग्णालयात पाठविण्याची कार्यवाही करावी असे निर्देश  देण्यात आले.

Commissioner in Action, Microplanning for corona treatment, contact tracing will be doubled