आभासी प्रतिस्पर्ध्यास ठोसे देण्याची स्पर्धा कधी ऐकलीये का? पण अशी स्पर्धा होणार आहे! वाचा बातमी

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 20 मे 2020

दी इंडिया शॅडो बॉक्सिंग चॅलेंज अर्थात आभासी प्रतिस्पर्ध्यास ठोसे देण्याची स्पर्धा होणार आहे. कोरोनामुळे बॉक्सिंगसारख्या शरीरसंपर्क खेळांच्या स्पर्धा कधी सुरु होणार हे अनिश्चित असताना देशभरातीलच नव्हे तर जगभरात असलेल्या भारतीय बॉक्सरना ही एक संधी मिळाली आहे. 

मुंबई : दी इंडिया शॅडो बॉक्सिंग चॅलेंज अर्थात आभासी प्रतिस्पर्ध्यास ठोसे देण्याची स्पर्धा होणार आहे. कोरोनामुळे बॉक्सिंगसारख्या शरीरसंपर्क खेळांच्या स्पर्धा कधी सुरु होणार हे अनिश्चित असताना देशभरातीलच नव्हे तर जगभरात असलेल्या भारतीय बॉक्सरना ही एक संधी मिळाली आहे. 

मुंबईत कोरोनाचा बॉम्ब फुटलाय का ? आजही मुंबईत वाढलेत 'एवढे' रुग्ण...

कोरोनामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. त्यातच आपल्या खेळाच्या स्पर्धा कधी होणार याची चिंताही बॉक्सरना आहे, त्यामुळे असलेली निराशा दूर करण्यासाठी मुंबई बॉक्सिंग संघटनेने ही संकल्पना मांडली आहे आणि त्यास भारतीय बॉक्सिंग महासंघाने मान्यता दिली आहे.  ही स्पर्धा 80, 70, 60, 50, 40 वर्षावरील तसेच 40, 19, 17, 15, 13, 11 आणि 9 वर्षाखालील गटात होईल. 

या नव्या स्पर्धेत समोर प्रतिस्पर्धी नसेल, पण तो आहे हे समजून बॉक्सरला आपले कौशल्य दाखवावे लागेल. त्यासाठी त्याला अर्धा मिनिट वेळ देण्यात येईल. यात सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही. त्यात नऊ वर्षाखालील नवोदित बॉक्सरपासून ते 80 वर्षावरील बॉक्सिंग प्रेमी सहभागी होऊ शकतील. यामुळे पुन्हा बॉक्सिंगचे कौशल्य आजमावले जाईल तसेच बॉक्सर उत्साहाने या आगळ्या स्पर्धेत आपला कस पणास लावतील. 
कोणत्याही बॉक्सरसाठी शॅडो बॉक्सिंग नवीन नाही. रोजचा नियमीत सराव सुरु होण्यापूर्वी मार्गदर्शक खेळाडूस हे करण्यास भाग पाडतात, ज्याद्वारे स्नायू बॉक्सिंगसाठी तयार होतात. हे एक प्रकारचे वॉर्मअप असते ज्याद्वारे ते तंत्रशुद्ध बॉक्सिंग शिकण्यास तयार होतात. 

भूगोल विषयाच्या गुणांचा निर्णय लवकरच; शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर

प्रतिस्पर्धी नसेल, तर बॉक्सर पंचिंग बॅगवर ठोसे देण्याचा सराव करतात, पण या स्पर्धेत पंचिंग बॅगही नसेल. प्रतिस्पर्धी आपल्या समोर आहे असे समजून त्याला ठोसे द्यायचे आहेत. त्याच्यापासून बचाव करायचा आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना 21 ते 31 मे दरम्यान आपला तीस सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट करायचा आहे. आपला व्हिडिओ आकर्षक करण्यासाठी बॉक्सर त्यास संगीताचीही जोड देऊ शकतात. हे व्हिडिओ ते या चॅलेंज स्पर्धेच्या फेसबुक पेजवर पोस्ट करु शकतात किंवा टेलीग्राम तसेच व्हॉटस््अॅपही करु शकतात. त्यासोबत स्पर्धकांना नाव, वय, वयोगट, राज्य तसेच मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे.

फेसबुक ः https://www.facebook.com/India-Shadow-Boxing-Challenge-100417551689965/
टेलिग्राम ः https://t.me/joinchat/S5ZUVU75E77-InnDAtRNXw
व्हॉटस््अॅप ः https://chat.whatsapp.com/HCwyHXN2i6vFxZk7S7Mkwk
कालावधी ः 21 ते 31 मे 

या बॉक्सिंग चॅलेंजमध्ये भारतात राहणारे किंवा परदेशात राहणारे भारतीय नागरीक सहभागी होऊ शकतात. बॉक्सिंग तज्त्र त्यातून सर्वोत्तम स्पर्धकांची निवड करतील. यासाठी वयाची किंवा वजनाची कोणतीही मर्यादा नाही. 
- जय कवळी, भारतीय बॉक्सिंग महासंघाचे सचिव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Competition to punch a virtual competitor