अखेर ठाण्यातील 'लॉकडाऊन'वर शिक्कामोर्तब; 'या' तारखेपासून शहरात असणार कडक निर्बंध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

मंगळवारी पालिका आयुक्त विपिन शर्मा आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यात चर्चा होऊन या लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब करण्यात आले.   

ठाणे : ठाणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरात संपूर्ण लॉकडाऊन घ्यायचा की नाही, यावरुन गेली दोन दिवस ठाणे पालिका आणि पोलिस प्रशासनात गोंधळ सुरू होता. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अखेर मंगळवारी अध्यादेश काढत संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार 2 जुलैला सकाळी सात ते 12  जुलैला सकाळी सात वाजेपर्यंत फक्त मेडीकल, हॉस्पिटल आणि दूध विक्री सुरु राहणार आहे.

हेही वाचा : वीजबिल जास्त येण्यामागची 'ही' आहेत कारणं, 'म्हणून' बसलाय तुम्हाला वीजबिलाचा शॉक

ठाणे शहरात आजच्या घडीला आठ हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 290 हून अधिक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनलॉक जाहीर झाल्यापासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. झोपडपट्टीपाठोपाठ अनेक सोसायटींमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बाळकूम, कोलशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगर आदीसह इतर भागात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार हे निश्चित मानले जात होते. परंतु सुरुवातीला ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत; ते भाग शोधून हॉटस्पॉट म्हणून घोषित करुन त्या भागांमध्येच बंद करण्याची चर्चा गेली दोन दिवस सुरु होती.

महत्वाची बातमी : वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं हे...

सोमवारी दुपारपर्यंत पालिका आणि पोलिस प्रशासनामध्ये चर्चा होऊन लॉकडाऊन घोषित करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार अध्यादेशही काढण्यात आला होता. परंतु अचानक रात्री उशिरा लॉकडाऊनबाबत गोंधळाचे वातावरण दिसून आले. त्यानंतर मंगळवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आयुक्तांना दिलेल्या अधिकारात नवा अध्यादेश काढून संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी पालिका आयुक्त विपिन शर्मा आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यात चर्चा होऊन या लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब करण्यात आले.                   

ही बातमी वाचली का? मुंबईकर... मास्क लावा, नाहीतर हजार रुपये तयार ठेवा...

काय बंद राहणार
ठाणे शहरातील अंतर्गत रस्ते बंद राहणार असून, प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. याशिवाय शहरातील किराणा मालाची दुकाने, इतर साहित्याची दुकाने, भाजी मार्केट बंद राहणार आहेत. टॅक्सी, रिक्षा सेवा देखील बंद असणार आहे. फक्त दूध विक्रीची दुकाने, मेडीकल, दवाखाने आणि हॉस्पिटल सुरु राहणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच ये - जा करण्याची मुभा असणार आहे. मद्यविक्रीची दुकानात फक्त होम डिलीव्हरीची सुविधा सुरु राहणार आहे.

Complete lockdown in Thane from tomorrow; Strict restrictions will be in place in the city


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complete lockdown in Thane from tomorrow; Strict restrictions will be in place in the city