DCM Eknath Shinde
sakal
मुंबई - भटके-विमुक्त समाजाला वर्षानुवर्षे दुर्लक्षित आणि उपेक्षित राहावे लागले. मात्र, आता भविष्यात 'भटके-विमुक्त' ही त्यांची ओळख पुसली जाऊन 'स्थिर आणि चिंतामुक्त समाज' हीच त्यांची खरी ओळख निर्माण झाली पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. अखिल भारतीय शिव भटके-विमुक्त सेनेच्या वतीने मुंबई येथे आज सोमवारी आयोजित भटके - विमुक्त हक्क, न्याय आणि विकास परिषदेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन 'अखिल भारतीय शिव भटक्या-विमुक्त सेने'चे राष्ट्रीय नेते तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले होते.