चित्त्यांच्या भारतातील आगमनावर काँग्रेसची टीका; फडणवीसांनी दिलं जोरदार प्रत्युत्तर

चित्त्यांच्या भारतातील आगमनाला काँग्रेसनं ड्रामा संबोधलं असून देशातील बेरोजगारीशी याचा संबंध जोडला आहे.
Rahul Gandhi_Devendra Fadnavis
Rahul Gandhi_Devendra Fadnavis
Updated on

मुंबई : चित्त्यांच्या भारतातील आगमनावर आता राजकारण सुरु झालं असून काँग्रेसनं याला ड्रामा संबोधलं आहे. तसेच याचा संबंध देशातील बेरोजगारीशी जोडला आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Congress criticizes arrival of cheetahs in India Devendra Fadnavis gave a strong reply)

Rahul Gandhi_Devendra Fadnavis
"PM मोदी ओबीसी नाहीत", पटोलेंच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार; म्हणाले...

फडणवीस म्हणाले, "काँग्रेस आपली जागा शोधतेय. काँग्रेस आता जनतेत नाही... ना लोकांमध्ये... ना संसदेत. काँग्रेसचं अस्तित्व अकुंचन पावायला लागलंय. त्यामुळं त्यांनी एकच धोरणं अवलंबलंय की प्रत्येक गोष्टीला फक्त विरोध करायचा. मला असं वाटत की देशाच्या लोकांनी चित्त्यांचं स्वागत केलंय"

Rahul Gandhi_Devendra Fadnavis
अमित शाहांची सुरक्षा पुन्हा भेदली! TRS नेत्यानं ताफ्यापुढंच पार्क केली कार

हे केवळ चित्ते नाहीत. तर आपल्या अन्नसाखळीतील महत्वाचा घटक आहेत. जेव्हा एखादा प्राणी नष्ट होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या अन्नसाखळीवर होतो, पर्यावरणावरही होतो. त्यामुळं ही साखळी जर आपण ठीक करत असू आणि त्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत असतील तर त्याचं आपण स्वागत करायला हवं. पण काँग्रेसमध्ये केवळ नकारात्मकता भरली आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com